Sudha Murty: इन्फोसिसच्या सुधा मूर्ती यांनी अभिनेता शाहरुख खानबद्दल केलं मोठं वक्तव्य

0

मुंबई,दि.17: Sudha Murty: इन्फोसिसच्या सुधा मूर्ती यांनी अभिनेता शाहरुख खानबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. इन्फोसिस फाऊंडेशनच्या संस्थापिका सुधा मूर्ती या समाजसेविका, लेखिका आणि शिक्षिका म्हणूनही ओळखल्या जातात. अत्यंत हुशार आणि यशस्वी उद्योजिका असलेल्या सुधा मूर्ती या अतिशय साधेपणानं आयुष्य जगतात. अलिकडेच सुधा मूर्ती द कपिल शर्मा शो कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांच्याबरोबर रविना टंडन आणि द एलिफेंट व्हिस्पर्स डॉक्युमेंट्रीच्या निर्माता गुनीत मोंगा देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी सुधा मूर्ती यांनी त्यांना सिनेमाविषयी असलेलं प्रेम आणि शाहरुख खान याच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं.

सुधा मूर्ती काय म्हणाल्या? | Sudha Murty

यशस्वी उद्योजिका, समाजसेविका असलेल्या सुधा मूर्ती यांना सिनेमांची खूप आवड आहे. सुधा मूर्ती यांनी आतापर्यंत अनेक सिनेमे पाहिले आहेत. त्याबद्दल त्यांनी कार्यक्रमात त्याचं मनोगत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या की, ‘मी खूप सिनेमे पाहिले आहेत. मला आठवतं की मी जेव्हा पुण्यात होते तेव्हा कुणी तरी माझ्याशी रोज सिनेमा पाहण्याची पैज लावली होती. त्यानुसार मी ३६५ दिवस रोज एक सिनेमा पाहिला.’

तरुणपणीच्या आठवणींना उजाळा

कार्यक्रमात सुधा मूर्ती यांनी त्यांच्या तरुणपणीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितलं की, ‘मी जेव्हा तरुण होते तेव्हा दिलीप कुमार माझे आवडते अभिनेते होते. अभिनेता म्हणून ते भाव ओतून भूमिका साकारायचे तसं इतर कुणीच केलं नाही. तसा अभिनय फक्त शाहरुख खानच करू शकतो.’

View this post on Instagram

A post shared by Sony LIV (@sonylivindia)

आता शाहरुख त्यांची जागा घेत आहे

सुधा मूर्ती यांनी पुढं सांगितलं की, ‘जेव्हा मी त्यांचा वीर जारा सिनेमा पाहिला तेव्हा मी माझ्या मुलीला सांगितलं की, जर दिलीप कुमार आज तरुण असते तर तेच या सिनेमात असते. आता शाहरुख खाननं त्यांची जागा घेतली आहे. फक्त तोच असं करू शकतो.’

कपड्यांवरून लोकांनी त्यांची किंमत केली

सुधा मूर्ती यांनी आधीच्या भागात कपड्यांवरून त्यांच्यावर टीका केली जायची असं सांगितलं होतं. सुधा जेव्हा बिझनेस क्लासनं प्रवेश करत होत्या तेव्हा त्या अतिशय साध्या वेशभूषेत तिथं गेल्या होत्या. तेव्हा त्यांच्याकडे तिथल्या लोकांना वाईट पद्धतीनं पाहिलं होतं.

सुधा मूर्ती यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांची सर्व पुस्तके लोकप्रिय आहेत. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमधील स्त्री पात्रे सक्षम आणि आपल्या मतांवर ठाम असणाऱ्या अशा आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here