Home महाराष्ट्र Anil Gote | माजी आमदार अनिल गोटे यांचा खळबळजनक दावा

Anil Gote | माजी आमदार अनिल गोटे यांचा खळबळजनक दावा

0

धुळे,दि.२७: शिवसेना (UBT) नेते आणि माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) गंभीर निशाणा साधला आहे. “मी गेल्या ५० वर्षांपासून संघ परिवारात आहे, मात्र माझ्या आठवणीनुसार १९८५ पर्यंत संघाच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो कधीच लावण्यात आला नव्हता,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. भाजपकडून आमदारकी भूषवलेले गोटे आता सातत्याने भाजपच्या धोरणांवर हल्लाबोल करत आहेत.

महाराणा प्रताप आणि शिवरायांवरून टीका (Ideological Debate)

अनिल गोटे यांनी भाजपच्या विचारधारेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले की, “भाजपसाठी हिंदूंचा खरा नेता म्हणजे महाराणा प्रताप आहेत, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांशी काहीही देणे-घेणे नाही.” बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांनी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा संदर्भ देत गोटे यांनी आपला संताप व्यक्त केला.

‘राजकीय आश्रयाशिवाय बुवा-बाजी अशक्य’ (Political Support)

“कोणतेही बुवा किंवा बाबा राजकीय आश्रयाशिवाय (Political Support) मोठे होऊ शकत नाहीत,” असे म्हणत गोटे यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. नागपूरमधील ज्या कार्यक्रमात शास्त्री यांनी वादग्रस्त विधान केले, तिथे सरसंघचालक मोहन भागवत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह (Questions on Home Department)

अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाचा उल्लेख करत गोटे यांनी थेट गृहखात्यावर टीका केली. ते म्हणाले, “खरात जर गेल्या १० वर्षांपासून हे उद्योग करत होता, तर मग गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना संबंधित आयुक्तांना निलंबित (Suspend) का करण्यात आले नाही? केवळ राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी (Political Blackmailing) अशा प्रकरणांचा वापर केला जातो का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.