सोलापूर,दि.२८: दुकानाचा दरवाजा उघडा होता, एक ग्राहक आत शिरला, पण हा ग्राहक कोणी सामान्य माणूस नव्हता! काही क्षणांत जे घडले ते पाहून सर्वच थक्क झाले. या घटनेचा व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral) होत आहे.
नेमकी घटना काय?
थायलंडमधील एका छोट्या दुकानात एक जंगली हत्ती अतिशय शांतपणे शिरला. एखाद्या नियमित ग्राहकाप्रमाणे त्याने दुकानात फेरफटका मारला आणि आपल्या सोंडेने आवडीचे स्नॅक्स (Snacks) उचलून खाण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये दिसते की, या हत्तीने मोठ्या कौशल्याने राइस क्रॅकर्स, सँडविच आणि केळी उचलली आणि तिथेच फस्त केली. काही मिनिटे ‘शॉपिंग’ केल्यानंतर, तो हत्ती कोणताही गोंधळ न घालता शांतपणे बाहेर पडला.
परिसरातील परिचयाचा ‘पाहुणा’
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्तीचे नाव ‘प्लाय बियांग टेक’ असून तो जवळच्या नॅशनल पार्कचा रहिवासी आहे. अन्नाच्या शोधात तो वारंवार मानवी वस्तीत येत असतो. यावेळी हत्तीने दुकानातील सुमारे २५ डॉलर्स किमतीचे स्नॅक्स खाल्ले. मात्र, त्याने कोणतीही आक्रमकता (Aggression) दाखवली नाही. एका वन्यजीव संरक्षण संस्थेने (Wildlife Protection Organization) दुकानदाराच्या नुकसानीची भरपाई केली आहे.








