Home सोलापूर वार्ता सोलापुरातील सर्वात मोठ्या लेझीम पथकाचा सराव सुरू; सरावाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड...

सोलापुरातील सर्वात मोठ्या लेझीम पथकाचा सराव सुरू; सरावाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

0
शिवशक्ती नवरात्र बहुउद्देशिय समाज सेवी संस्था सोलापूर

सोलापूर,दि.१: नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील लोणार गल्ली येथील ‘शिवशक्ती नवरात्र बहुउद्देशीय समाज संस्थे’च्या भव्य लेझीम सरावाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. ७०० ते ८०० कलावंतांचा सहभाग असलेल्या या सोलापुरातील सर्वात मोठ्या लेझीम पथकाच्या सरावाचा नेत्रदीपक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

भाजप नगरसेवक तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बिज्जू प्रधाने आणि त्यांचे बंधू सतीश प्रधाने दरवर्षी नवरात्रोत्सवात समाजप्रबोधनात्मक व्याख्याने व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करतात. याच परंपरेनुसार यंदा आयोजित लेझीम सराव शिबिराचे उद्घाटन भाजप नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या हस्ते पार पडले.

या सराव शिबिरात उद्योगपती केदारनाथ दामा, दीपक गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष सचिन गायकवाड, कार्याध्यक्ष श्रीकांत सुरवसे, उपाध्यक्ष रोहन मेथे, अमोल पंढरी, खजिनदार राहुल गवळी आणि आशिष प्रधाने यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. शेकडो तरुणांच्या तालबद्ध लेझीमच्या तालावर रंगलेला हा सराव पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.