मुंबई,दि.17: काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते संभ्रम निर्माण करत आहेत असे आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लोकसत्ताला दिलेली मुलाखत मी वाचली. मी राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांचीही मुलाखत पाहिली. या सगळ्या दृष्टीने समोर येऊन तिघांनी मिळून ठरलेलं धोरण सांगत असताना यांच्या स्वतंत्र मुलाखती वेगळं दर्शवत आहेत. असं माझं निरीक्षण आहे असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते संभ्रम निर्माण करत आहेत असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत ऑल इज नॉट वेल आहे का? याची चर्चा सुरु झाली आहे.
भाजपा ही एकेकाळी सभ्य पार्टी होती | MLA Bhaskar Jadhav
भाजपा ही एकेकाळी सभ्य पार्टी होती. आता मात्र ती बेछूट आरोप करणारी पार्टी झाली आहे. आमच्या पक्षात फूट पडण्याला तेच जबाबदार आहेत. उद्धव ठाकरे मात्र या लोकांना तोंड देत आहेत. आत्ता पर्यंत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वज्रमूठ सभा झाल्या. तर चार दिवसांपूर्वी महाविकास आघाडीची एक बैठक पार पडली. यात जो धोरणात्मक निर्णय झाला त्यापेक्षा नाना पटोले आणि जयंत पाटील यांनी आपल्या मुलाखती देताना घेतलेली भूमिका वेगळी आहे. हे लोक संभ्रम निर्माण करु पाहात आहेत असंही जाधव यांनी स्पष्ट केलं.
समोर येऊन तिघांनी एक सांगायचं आणि…
आमच्या पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांची प्रकृती बरी नसतानाही जे लोक पाठिंबा देण्यासाठी येत होते तेव्हा त्यांनी लोकांना भेटण्याचं काम केलं. आपल्या पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संपर्क साधला. महाराष्ट्रात विविध ठिकाणी सभाही घेतल्या. आता उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. पदाधिकारी संभाव्य लढाईच्या दृष्टीने सजग असावेत म्हणून आजची बैठक बोलवण्यात आली आहे असंही भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलं आहे. चार दिवसांपूर्वी सिल्वर ओक या ठिकाणी मविआची बैठक झाली. या बैठकीत काय धोरणात्मक निर्णय झाला ते महाराष्ट्राला तिन्ही पक्षांनी सांगितलं. मात्र त्यानंतर काँग्रेसचे नाना पटोले आणि जयंत पाटील यांनी व्यक्त केलेली भूमिका दिसते आहे. समोर येऊन तिघांनी एक सांगायचं आणि वेगळ्या मुलाखती मात्र वेगळं दर्शवत आहेत असंही जाधव यांनी म्हटलं आहे.
सत्ताधारी आमच्याविषयी काय म्हणत आहेत याला मी कवडीचीही किंमत देत नाही. काल-परवाकडे कर्नाटकचा निकाल लागल्यानंतर भाजपाची भाषा काय बोलली ऐकलं का? आमची काळजी करायची गरज नाही वगैरे म्हणाले. भाजपा ही एकेकाळी सभ्य पार्टी होती. ती पार्टी आता सुसंस्कृतपणा आणि सभ्यपणा विसरली आहे आणि बेछूट आरोप करणारी पार्टी झाली आहे असाही आरोप भास्कर जाधव यांनी केला.