मुंबई,दि.11: शरद पवारांनी (Sharad Pawar) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जादूटोणा केला आहे असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जोरदार टोला लगावला आहे. शरद पवार हेच राष्ट्रवादीमधील भोंदूबाबा आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला आहे. जादूटोणा करण्यात आल्यामुळे उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीच्या जाळ्यात अडकल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यासोबतच त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील खोचक टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला आहे. जादूटोणा केल्यामुळेच उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीप्रमाणे विचार करतात. शरद पवार हे राष्ट्रवादीचे भोंदूबाबा आहेत. त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला. एकदा का या भोंदूबाबाच्या ताब्यात कोणी आलं तर त्याची सुटका होत नाही, अशा शद्बात बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्यावर निशाणा
दरम्यान यावेळी बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. जयंत पाटील यांनी सत्तेचं स्वप्न पहाणं सोडून दिलं पाहिजे. जयंतरावांनी काळजी करू नये आम्ही पुन्हा त्यांना सत्तेत येऊ देणार नाही. आमचे पुढच्या निवडणुकीत 200 आमदार निवडून येतील असा दावा देखील बावनकुळे यांनी केला आहे.
राजकारण तापणार?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे. शरद पवार हे राष्ट्रवादीचे भोंंदूबाबा असून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच शरद पवार यांच्या जाळ्यात एखादा अडकला तर त्याची सुटका होत नाही असंही ते म्हणाले आहेत. आता बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी देखील आक्रमक होण्याची शक्यता आहे. यावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगण्याची शक्याता आहे.