Palghar ST Bus Accident: एसटी बसचा भीषण अपघातात २८ प्रवासी जखमी

Palghar ST Bus Accident: दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे.

0

पालघर,दि.७: Palghar ST Bus Accident एसटी बस अपघातात २८ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २८ प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती समोर आली असून एक प्रवासी गंभीरित्या जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जव्हार-सिल्वासा मार्गावर जयसागर डॅमजवळ नाशिक- सिल्वासा आणि जळगाव- सिल्वासा या दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही एसटी बसचं प्रचंड नुकसान झालं. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन्ही बसमधील २८ प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना जव्हार येथील पतंगशाहा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील एक प्रवासी गंभीररित्या जखमी झाल्यामुळे त्याला सिल्वासा येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here