Home अपघात Rajdhani Express Fire | मध्य प्रदेशात राजधानी एक्सप्रेसला भीषण आग; ६८ प्रवाशांची…

Rajdhani Express Fire | मध्य प्रदेशात राजधानी एक्सप्रेसला भीषण आग; ६८ प्रवाशांची…

0
Rajdhani Express Fire | मध्य प्रदेशात राजधानी एक्सप्रेसला भीषण आग; ६८ प्रवाशांची…

रतलाम,दि.१७: Rajdhani Express Fire | त्रिवेंद्रम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (त्रिवेंद्रम हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस) रविवारी पहाटे मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात भीषण आग लागली. या अचानक लागलेल्या आगीमुळे रेल्वेतील प्रवाशांमध्ये प्रचंड भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, या रतलाम रेल्वे अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

एसी कोच ‘बी-१’ मधून आगीची सुरुवात | Rajdhani Express Fire

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या देशाने जाणाऱ्या या राजधानी एक्सप्रेसला पहाटे ५.३० च्या सुमारास लुणी-रीछा आणि विक्रमगड स्थानकांदरम्यान आग लागली. ही आग सर्वप्रथम एसी कोच बी-१ मध्ये लागली आणि पाहता पाहता ती शेजारील इतर दोन डब्यांमध्येही पसरली. या राजधानी एक्सप्रेस आगीमुळे (Rajdhani Express Fire) रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे.

‘हूटर’ वाजताच प्रवाशांची धावपळ; ६८ प्रवासी सुखरूप

ट्रेनला आग लागताच आपत्कालीन हूटर वाजू लागल्याने प्रवाशांना धोक्याची घंटा मिळाली. रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने रेल्वे बचाव कार्य (Railway Rescue Operation) हाती घेतले. दुर्घटनाग्रस्त डब्यांमधून सर्व ६८ प्रवाशांना वेळेत आणि सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले. खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे रोखून धरण्यात आली होती.

Rajdhani Express Fire

रेल्वे प्रशासनाकडून तातडीने मदत कार्य सुरू

अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे मदत पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघात झालेली जागा राजस्थानमधील कोटा रेल्वे मंडळाच्या (Kota Railway Division) अखत्यारीत येते. मात्र, मध्य प्रदेशातील रतलाम रेल्वे मंडळ जवळ असल्याने तिथले विभागीय रेल्वे व्यवस्थापक अश्विनी कुमार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याची पाहणी केली. दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.