कल्याण,दि.१७: (Kalyan Crime News) | पुण्याच्या नसरापूरमधील चिमुरड्या मुलीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच, आता मुंबईजवळील कल्याण रेल्वे स्थानकातून (Kalyan Railway Station) एक संतापजनक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. एका नराधमाने अल्पवयीन मुलीचा मोबाईल हिसकावून घेत, तिला धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे कल्याण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून रेल्वेतील कायदा व सुव्यवस्थेवर (Law and Order) पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. (Kalyan Railway Station Crime)
मामाच्या गावी जाताना घडली घटना (Kalyan Railway Station Crime)
प्राथमिक माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी अहिल्यानगर (Ahilyanagar) येथून खोपोली येथे राहणाऱ्या आपल्या मामाच्या घरी जाण्यासाठी निघाली होती. कल्याण रेल्वे स्थानकात ती खोपोली लोकल ट्रेनची (Local Train) वाट पाहत उभी होती. याच दरम्यान आरोपी सौरभ सोनावणे याने तिच्यावर पाळत ठेवून तिच्या हातातील मोबाईल फोन हिसकावून घेतला.
‘पोलीस ठाण्यात चल’ म्हणत यार्डात नेले आणि… (Modus Operandi)
मुलीने जेव्हा आपला मोबाईल परत मागितला, तेव्हा आरोपी सौरभने तिला धमकावले. ‘मोबाईल पाहिजे असेल तर माझ्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये (Police Station) चल’, असे सांगून त्याने मुलीला फसवले. आरोपीने तिला रेल्वे स्थानकातील निर्जन अशा रेल्वे यार्डात (Railway Yard) नेले आणि तिथे तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार (Rape News) केला.
पीडितेचे धाडस आणि पोलिसांची तत्परता (Police Action)
या भयानक प्रसंगातून मुलीने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि थेट कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे (Railway Police Station – GRP) गाठले. घाबरलेल्या अवस्थेतील मुलीने पोलिसांना घडलेला सारा प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून लोहमार्ग पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासून पोलिसांनी आरोपी सौरभ सोनावणे याला अवघ्या काही तासांत शोधून काढून बेड्या ठोकल्या.
रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह (Railway Passenger Safety)
कल्याणसारख्या अत्यंत गजबजलेल्या रेल्वे स्थानकात अशी धक्कादायक घटना घडल्याने प्रवाशांमध्ये, विशेषतः महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. इतक्या मोठ्या स्थानकात हा प्रकार घडत असताना रेल्वे सुरक्षा बल (RPF) किंवा लोहमार्ग पोलीस (GRP) कुठे होते? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता रेल्वे प्रशासन आणि सरकार काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








