जालना,दि.18: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमदार प्रसाद लाड यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आग्रही असून त्यांनी 20 जुलै रोजी उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे. प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. लाड यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना जरांगेंचा तोल सुटला आणि त्यांनी प्रसाद लाड यांच्यावर शिवीगाळ केली.
मनोज जरांगे यांना डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषाचा रोग झाल्याची टीका केली होती. लाड यांच्यावर जरांगे यांनी शेलक्या शब्दात टीका केली. माझ्या नादी लागू नका, तू किती पैसेवाला आणि करप्ट आहेस हे सांगायलं लाऊ नको, तू जात विकून घर मोठं करणारी औलाद आहेत असं मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांना सुनावलं आहे. देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेत, आता मराठे आमदार आणि मंत्री मराठ्यांच्याच अंगावर घालत मजा पाहत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.
मी जातीसाठी लढतो. तुम्ही काहीही करा, माझ्या नादी लागू नका. 288 पाडायचे की उभे करायचे मी ठरवणार. मराठ्यांचं रक्त असेल तर फडणवीसांना जाब विचारा. 20 जुलै रोजी उपोषणाला बसणार असं देखील जरांगे पाटील म्हणाले.
आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना जरांगे संतापले. ते म्हणाले की, हा कोण बांडगुळ आता? माझ्या नादाला लागू नको, तू किती पैसेवाला आणि किती करप्ट आहे. तू जात विकून घर मोठं करणारी औलाद आहेस. मी तुला काय म्हटलंय का? तू देवेंद्र फडणवीस यांचं पाय चाट नाहीतर काही कर, आमच्या नादी लागू नकोस. तुम्ही मोठे लोक आमच्या जातीसाठी भूषण होता, आता तुम्ही नीच निघाला.