सोलापूर,दि.18: जयराज नागणसुरे यांच्यामुळे बोगस नोंद उघडकीस आली आहे. जयराज नागणसुरे यांनी सोलापूर नगर भूमापन कार्यालयात अनेक बोगस नोंदी आहेत असा दावा केला आहे. त्याचाच भाग म्हणून रविवार पेठ येथील सिटी सर्वे क्रमांक 9/178, 493.30 चौरस मीटर जागा मुंबई येथील सिद्राम तुकाराम धडके यांची आहे. ही जागा 26/10/2020 पर्यंत त्यांच्याच नावावर होती.
कुठलेही खरेदीखत न होता 25 /11/2020 ला नगरभूमापन अधिकारी कांगने यांनी लिपिक भागानगरे व एक खाजगी इसम यांनी संगनमताने बोगस कागदपत्रे तयार करून रूप्पणा भीमण्णा दूर्लकर यांच्या नावे करण्यात आली. याची शहानिशा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसूरे यांनी चौकशी केली असता नगर भूमापन प्रमुख लिपिक सतीश कवडे यांनी असा प्रकार झाल्याची कबुली दिली.
विशेष म्हणजे दोन नावाचा एकच उतारा आहे. जयराज नागणसुरे यांनी माहितीचा अधिकार अर्ज करताच आपली चोरी पकडली गेली आहे असे समजताच 2 /7/2024 ला गडबडीत नवीन 7/12 पुन्हा सिद्राम तुकाराम धडके यांच्या नावे अपडेट करण्यात आला.
असे अनेक बोगस नोंदणी या कार्यालयात आहेत या संदर्भात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री विभागीय आयुक्त, लोकायुक्त, सोलापूर जिल्हाधिकारी, सोलापूर पोलिस आयुक्त, सोलापूर लाचलुचपत कार्यालया कडे तक्रार प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती नागणसुरे यांनी दिली.