अहमदनगर,दि.16: अहमदनगरमध्ये रेल्वेच्या दोन डब्यांना ही आग लागली असून त्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. आष्टी रेल्वेला भीषण आग (Ahmednagar Railway Fire) लागल्याची घटना घडली आहे. नगर तालुक्यातील शिराडोह परिसरात रेल्वेच्या दोन डब्यांना आग लागली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याची माहिती आहे. आग आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र आगीत रेल्वेचं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती आहे.
नगरमधील शिराडोह परिसरातील रेल्वेला ही आग लागली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही. ही आग लागताच सर्व प्रवाशांना सुखरूप गाडीबाहेर काढण्यात आलं, त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र ही आग इतकी भीषण होती की त्यामध्ये रेल्वेचे मोठं नुकसान झालं आहे. सध्यातरी ही आग नियंत्रणात आणण्यासाठी यद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याची चौकशी करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी साडे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. या ठिकाणी आता अग्निशमन दल पोहोचलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या रेल्वेमधील प्रवासी हे बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच या गाडीला प्रवाशांचा तेवढा प्रतिसाद नसल्याने गोंधळही झाला नाही.