निवडणुकीत पत्नीने दिले भाजपला मत, तेव्हा संतापलेला पतीने दिला तलाक

0

छिंदवाडा,दि.25: मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील एका 26 वर्षीय महिलेने दावा केला आहे की, तिने भाजपला पाठिंबा दिल्याच्या रागातून तिच्या पतीने तिला तिहेरी तलाक दिला आहे. मात्र, महिलेच्या पतीने हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्याने पत्नीवर अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रभारी उमेश गोल्हानी यांनी सांगितले की, पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, तिचा आठ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. काही काळ सासरच्यांशी तिचे संबंध चांगले राहिले, पण नंतर पती, सासू, वहिनी यांनी तिला कोणत्या ना कोणत्या कारणावरून टोमणे मारणे सुरू केले.

दीड वर्षांपूर्वी आपल्याला घरातून हाकलून देण्यात आल्याचा दावा महिलेने केला आहे. ती पतीसोबत भाड्याच्या खोलीत राहत होती. दरम्यान, निवडणुका झाल्या तेव्हा महिलेने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आणि त्यांच्या बाजूने मतदान केले. यामुळे तिचा पती संतापला. त्याने तिला ‘तिहेरी तलाक’ दिला

महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिचा पती, सासू आणि चार मेहुण्यांविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायदा, मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) कायदा आणि भारतीय दंडविधान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तपास केला जात आहे.

महिलेचे म्हणणे आहे की तिच्या पतीने घटस्फोटाची नोटीस पाठवली होती, ज्यामध्ये तिच्यावर वाईट चारित्र्य आणि अवैध संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता, जो पूर्णपणे खोटा आणि निराधार आहे. तिने पतीच्या घटस्फोटाच्या नोटीसला तिच्या वकिलामार्फत उत्तर पाठवले आहे.

दुसरीकडे, महिलेच्या पतीने आरोप केला आहे की, तिचे काही लोकांशी अवैध संबंध आहेत. त्याने तिला अनेक वेळा समजावून सांगितले आणि समेट घडवून आणण्याची संधी दिली, पण ती मान्य झाली नाही. यानंतर त्याने 30 मार्च 2022 रोजी मुस्लिम कायद्यानुसार तिला पहिल्यांदा घटस्फोट दिला. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2023 मध्ये दोनदा घटस्फोट झाला.

पतीने असाही दावा केला की घटस्फोट देण्याचे कारण कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणे हे नाही, कारण 2022 मध्ये कोणत्याही निवडणुका नव्हत्या, जेव्हा त्याने घटस्फोट दिला होता. ही महिला आपल्याला धमकावत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यातून त्याची प्रतिमा खराब होत आहे. ती त्याच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याबद्दल बोलत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here