मुंबई,दि.11: विरोधी पक्षाच्या आमदारांनी भाजपा व महायुतीच्या विरोधात निर्दशने केली. पावसाळी अधिवेशनाच्या बाराव्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधी पक्ष आक्रमक झाला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत ‘भाजप हटवा, भ्रष्टाचार मिटवा’, ‘योजनेत सरकार घेते टक्केवारी वर सांगतात आम्ही नाही भ्रष्टाचारी’ तसेच ‘महायुती सरकारचे एकच मिशन, प्रत्येक कंत्राटात 30 टक्के कमिशन’, म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
महाविकास आघाडीच्या आमदारांनी मुंबई येथे विधान भवनाच्या पायऱ्यांवर राज्यात वाढलेल्या भ्रष्टाचार विरोधात जोरदार निदर्शने केले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अजय चौधरी, राजन साळवी, काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना आणले रस्त्यावर भ्रष्टाचारी सत्तेच्य गादीवर, महायुती सरकारचे एकच मिशन प्रत्येक कंत्राटात 30 टक्के कमिशन, ‘भ्रष्टाचारी झाले सत्ताधारी, कष्टकरी झाले भिकारी’, योजनेत सरकार घेते टक्केवारी वर सांगतात आम्ही नाही भ्रष्टाचारी, भाजप हटवा भ्रष्टाचार मिटवा, सत्ताधारी आमदार ते मंत्री सर्वांना हवी दलालांची मैत्री, अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत महायुती सरकारच्या काळात राज्यात वाढलेल्या भ्रष्टाचार विरोधात निदर्शन केले.