Sujay Vikhe Patil: फडणवीस कधी काय जादू करतील हे सांगता येत नाही, त्यांनी पूर्वीही…

0

अहमदनगर,दि.15: खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची स्तुती केली आहे. “फडणवीस जादूगार आहेत, ते कधी काय करतील सांगता येत नाही. त्यांनी पूर्वीही अशीच जादू केली आहे”, अशी स्तुतिस्तुमने भाजपचे नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील यांनी उधळली आहेत. नुकतेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) नॉट रिचेबल झाले होते. यावरुन विचारले असता विखे पाटील यांनी भविष्यात काहीही होऊ शकते, असं म्हटलं आहे. याचवेळी महाविकास आघीडीवरही त्यांनी तोंडसुख घेतलं. शहरातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

काय म्हणाले सुजय विखे पाटील? | Sujay Vikhe Patil On Devendra Fadnavis

अजित पवार यांच्या मोबाईलला रेंज नसेल्याने संपर्क होऊ शकला नसेल, असा टोला विखे पाटील यांनी लगावला. पुढे ते म्हणाले, की हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु, सध्याच्या राजकीय परिस्थिती पाहता ते फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे. परंतु, फडणवीस हे जादूगर आहेत ते कधी काय जादू करतील हे सांगता येत नाही. त्यांनी पूर्वीही एक जादू केली आहे. त्यामुळे भविष्यात काय जादू करायची हे तो जादूगरच ठरवत असतो. मी काही सांगू शकत नाही, मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आघाडीत पहिल्यापासूनच बिघाडी आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने ही नाराजी पुढे येईल असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडीवर सुजय विखे यांची टीका | Sujay Vikhe Patil

राज्यात भाजपा आणि सेनेचे सरकार आल्यापासून जे काम राज्यात होत आहे त्या कामांमुळे महाविकास आघाडी धास्तावली आहे. शेतकऱ्यांबाबतची निर्णय असो किंवा इतर निर्णय ते सरकारने घेतले आहेत. त्यामुळे आघाडी सैरभैर झाली आहे. मुंगेरी लाला के हसीन सपने ते त्यांनी पहावेत आम्ही आमचं काम करत राहू, अशी टीका भाजपा खासदार सुजय विखे यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here