सोलापूर,दि.20: संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबई येथे पार पडून या बैठकीत सोलापूर शहर अध्यक्ष शाम कदम यांची पुणे विभागीय अध्यक्षपदी (पश्चिम महाराष्ट्र) निवड करण्यात आली. मुंबई येथील अतिथी सभागृहात संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय कार्यकारणीची बैठक पार पडली.
शाम कदम यांना दिल्या अनेकांनी शुभेच्छा
या बैठकीत निवडीचे नियुक्तीपत्र संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते व संभाजी ब्रिगेडचे महासचिव सुभाष बोरकर, प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर भोसले, आत्माराम शिंदे, सुधाकर मोडक, सचिन सावंत, देसाई, अनिल पाटील, रमेश हांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. या निवडीबद्दल मराठा समाजसह सर्व बहुजन चळवळीतील मान्यवरांनी शाम कदम यांना शुभेच्छा दिल्या. या निवडीबद्दल संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने कदम यांचा सत्कार करण्यात आला.
माझ्यासारख्या कसलीही राजकिय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला संभाजी ब्रिगेड शाखाध्यक्ष ते पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड होण्याची संधी मिळाली याचे श्रेय सोलापुरातील संभाजी ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सोलापुरातील सर्व दैनिक, विविध न्यूज चॅनेल व पत्रकार बांधव, प्रेस छायाचित्रकार बांधव यांचे सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे सर्व मीडियाचे पत्रकार बांधवांचे विशेष आभार मानतो असे शाम कदम म्हणाले.