WHO ने घतली सात भारतीय कफ सिरप तयार करणाऱ्या कंपन्यांवर बंदी

0

नवी दिल्ली,दि.२१: WHO ने सात भारतीय कफ सिरप तयार करणाऱ्या कंपन्यांवर बंदी घातली आहे. आफ्रिकन देश गांबियासह जगभरातील ३०० लोकांच्या मृत्यूला जबाबदार धरून जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सात भारतीय कफ सिरप तयार करणाऱ्या कंपन्यांवर बंदी घातली आहे. यामुळे भारताच्या औषध निर्माण क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

कफ सिरप तयार करणाऱ्या कंपन्यांवर बंदी

याप्रकरणी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी बनावट औषधे कधीही सहन केली जाणार नसल्याचे म्हटले आहे. औषधांचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी सर्वसमावेशक जोखमीवर आधारित विश्लेषण केले जात आहे. भारत औषधांच्या गुणवत्तेशी कधीही तडजोड करणार नाही. बनावट औषधांमुळे कोणाचाही मृत्यू होऊ नये यासाठी आम्ही सदैव सतर्क असतो, असे ते म्हणाले. डब्ल्यूएचओने गांबियातील ६६ मुलांच्या मृत्यूसाठी भारतीय कफ सिरपला जबाबदार धरले आहे. कंपनी आणि नियामक अधिकारी या कंपन्यांची चौकशी करत आहेत.

९ देशांमध्ये अलर्ट जारी

गेल्या काही महिन्यांत जगातील अनेक देशांमध्ये दूषित कफ सिरपमुळे ३०० मुलांचा मृत्यू झाला आहे. कफ सिरपव्यतिरिक्त डब्ल्यूएचओने व्हिटॅमिन बनवणाऱ्या कंपन्यांचीही तपासणी केली आहे. याविषारी कफ सिरपच्या विक्रीबाबत आतापर्यंत ९ देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

किडनी निकामी

डब्ल्यूएचओ भारत आणि इंडोनेशियामध्ये कफ सिरप आणि व्हिटॅमिन बनवणाऱ्या २० कंपन्यांची चौकशी करत आहे. 

एका एजन्सीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या कंपन्यांच्या औषधांमध्ये डायथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉलचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. 

चार कफ सिरपच्या विरोधात अलर्ट जारी करण्यात आला आहे. या औषधांमुळे गांबियातील ६६ मुलांची किडनी निकामी झाल्याने मृत्यू झाला.

१२ मुलांचा मृत्यू

भारतातील कफ सिरपमुळे कॅमेरूनमध्येही १२ मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हे कफ सिरप  इंदूर येथील कंपनीकडून तयार केले जाते.

जगाची फार्मसी अडकली फेक ड्रग्जमध्ये

बनावट औषधे तयार करणाऱ्या ७१ कंपन्यांना नोटीस
१८ कंपन्यांना उत्पादन थांबविण्याचे आदेश
१२५ पेक्षा अधिक कंपन्यांमध्ये जोखीम आधारित विश्लेषण

१७.६ अब्ज अमेरिकन डॉलरचे कफ सिरफ भारताने २०२२-२३मध्ये निर्यात केले.
५०%+ लसींचा पुरवठा जगाला भारतातून
४०%जेनेरिक औषधांचा पुरवठा अमेरिकाचा 
१ जूनपासून खोकल्याच्या 
औषधांचे परीक्षण बंधनकारक
भारत औषध उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर असून, मूल्यानुसार १४ व्या क्रमांकावर आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here