Sambhajiraje Chhatrapati Solapur: “निधी मिळत नाही म्हणून हे सत्तेबाहेर पडले आता त्याच” संभाजीराजे छत्रपती

0

सोलापूर,दि.7: Sambhajiraje Chhatrapati Solapur: संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपा, राष्ट्रवादी आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. औरंगजेब देवेंद्र फडणवीस यांचा हिरो होऊ शकत नाही, पण देशाचा हिरो होऊ शकतो, असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यावरून प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीकाही होत आहे. आता या वादात स्वराज्य पक्षाचे नेते आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उडी घेतली आहे. संभाजीराजे यांनी याप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे.

संभाजीराजे छत्रपती सोलापुरात आले होते. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर नाव न घेता टीका केली. औरंगजेब हा देशात कोणत्याही समाजाचा किंवा व्यक्तीचा आदर्श होऊ शकत नाही. जे कोणी असं बोलत असतील ते साफ चुकीचे आहे, असं म्हणत संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर पलटवार केला आहे.

यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यातील समस्यांवरही भाष्य केलं. माझी खासदारांना सूचना आहे की, त्यांनी किसान रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वेमंत्र्यांकडे आग्रह धरावा. 37 देशात सांगोल्यातील डाळिंब जाते. मात्र किसान रेल्वे बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मी सांगोल्यात सर्व ठिकाणी फिरलो. आता येथे पाण्याचे दुर्भिक्ष आहे. येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्याचं साम्राज्य आहे. इथे रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र अतिशय निकृष्ट दर्जाचे रस्ते होत आहेत. त्याचे पुरावे मी स्वतः देईन, असं संभाजीराजे म्हणाले.

भाजपावर टीका | Sambhajiraje Chhatrapati Solapur

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची खिल्ली उडवली. राष्ट्रवादी म्हणायची आम्ही पुरोगामी विचाराचे लोक आहोत. जातीयवादी पक्षांसोबत जाणार नाही. तर भाजपचे नेते म्हणायचे, नाही नाही नाही.. आम्ही राष्ट्रवादी सोबत कदापिही युती करणार नाही. वर केंद्रात मोठमोठी भाषणं करतात. मात्र राज्यातही तेच बोलतात. चक्की पिसिंग पिसिंग.

निधी मिळत नाही म्हणून हे सत्तेबाहेर पडले आता त्याच

त्यांच्या आमदारांनी सर्वात जास्त टीका पवार कुटुंबावर केली. अजितदादा, शरद पवार यांच्यावर टीका केली. आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसावे लागत आहे. निधी मिळत नाही म्हणून हे सत्तेबाहेर पडले. आता त्याच नेत्याकडे अर्थ खात गेले, अशा शब्दात संभाजीराजे यांनी जोरदार टीका केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here