सोलापूर,दि.28: सतत वादग्रस्त विधान करणार्या मनोहर भिडे (संभाजी भिडे गुरुजी) यांनी पुण्यात राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि स्वातंत्र्यदिनाबद्दल वादग्रस्त भाष्य केलं आहे. देशाचा आणि तिरंग्याचा अपमान व देशाच्या प्रतीकांना हीन ठरवण्याचा प्रयत्न करणार्या मनोहर भिडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना भारताबाहेर हाकलून देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
मनोहर भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा
15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिन नाही, असं म्हणत त्यांनी राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजावरही भाष्य केलं आहे. 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिवस नाही, या दिवशी फाळणी झाली होती. ज्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधी पोरांनी फासावर लटकवून घेतलं.. असे म्हणून स्वतंत्रसाठी शहीद झालेल्या क्रांतिकारकांचा अपमान केला आहे.
’15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मान्य, हे हांडगं स्वातंत्र्य असेल ते पत्करलं पाहिजे. यावर्षीपासून 9 च्या ठोक्याला भगवा झेंडा घ्यावा. तिरंगाही घ्यावा छोटासा. दखलपात्र म्हणून’ असं म्हणून संभाजी भिडे यांनी तिरंगा आणि भगवा ध्वज याबाबत वाद निर्माण होईल, असं चिथावणीखोर विधान केलं आहे.
राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि स्वातंत्र्य दिनाबद्दल भिडेंचं विधान हे देशद्रोही आहे राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि स्वातंत्र्य दिन नाकारणे म्हणजे भारतीय राज्यघटना नाकारणे असा अर्थ होतो.
त्यामुळे अशा देशद्रोह्याला भारतात राहण्याचा नैतिक अधिकार नाही त्यामुळे त्याला भारताबाहेर हाकलून देणे गरजेचे आहे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले कार्याध्यक्ष अरविंद शेळके उपशहर प्रमुख सिताराम बाबर जिल्हा सचिव राजेंद्र माने संघटक रमेश चव्हाण दक्षिण सोलापूरचे शेखर चौगुले लखन गायकवाड सचिन होनमाने ज्ञानेश्वर पवार आदी उपस्थित होते.