Bail of labour officer: अपहरण प्रकरण लेबर ऑफिसरची जामीनावर मुक्तता

0

सोलापूर,दि.२८: Bail of labour officer: लेबर ऑफिसर प्रशांत पुरी यांची न्यायालयाने जामीनवर मुक्तता केली आहे. पुरी यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात हकिकत अशी की, दि. ०६/०२/२०२३ रोजी फिर्यादी संगीता भारत पवार यांनी मोहोळ पोलीस स्टेशन येथे अशी फिर्याद दिली की, आरोपी प्रशांत मोहन पुरी रा. ता. माजलगाव, जि. बीड यांच्यासह दोघांनी सकाळी ६.३० च्या सुमारास मोहोळ येथील कोळेगाव या गावाच्या शिवारात येवून त्यांचे पती भारत पवार यांना जबर मारहाण करुन त्यांचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण केले.

त्याप्रमाणे दि. २३/०२/२०२३ रोजी मोहोळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला व सदर आरोपी प्रशांत मोहन पुरी यांना पोलीसांनी तात्काळ अटक केली. सदर प्रशांत पुरी यांनी जामीन मिळण्याकामी ॲड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत जिल्हा व सत्र न्यायाधीश सोलापूर येथे जामीनाचा अर्ज दाखल केला.

जामीनवर मुक्तता | Bail of labour officer

सदर जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपींच्या वकिलांकडून असा युक्तीवाद करण्यात आला की, सदर आरोपी व त्यांचे वडिल हे ता. वाळवा, जि. सांगली येथील एका साखर कारखान्यामध्ये लेबर ऑफिसर म्हणून काम करतात. तसेच सदर तथाकथित फिर्यादीचे पती भारत पवार यांनी सदर कारखान्याकडून उसतोडीचे कामगार पुरवितो म्हणून रुपये १०,००,०००/- ची उचल घेतली होती.

परंतु सदर भारत पवार यांनी कुठल्याही प्रकारचे उसतोड कामगार आजतागायत सदर कारखान्यास पुरविलेले नाहीत. त्यामुळे सदर कारखान्याने सदर घेतलेल्या पैशांसाठी भारत पवार यांच्याकडे तगादा लावला होता. तसेच सदरची फिर्याद बघता सदर घटनेबाबत फिर्यादीने दि. ०६/०२/२०२३ रोजी मिसिंग कंप्लेंट दाखल केलेली असून त्यानंतर १७ दिवसांनी सदर अपहरण केल्याबद्दलची फिर्याद दाखल केलेली आहे. त्यामुळे प्रथमदर्शी सदर घटनेबाबत संशय निर्माण होतो तसेच सदरचे भारत पवार यांनी साखर कारखान्याकडून घेतलेले पैश्यांचा परतावा टाळण्यासाठी व भविष्यात उसतोड कामगार पुरवावे लागू नयेत, यासाठी सदरची खोटी फिर्याद दाखल केल्याची शक्यता नाकारता येत नाही. असा युक्तीवाद आरोपीतर्फे वकिलांनी केला.

सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शब्बीर औटी यांनी सदर आरोपी प्रशांत मोहन पुरी यांची जामीनावर मुक्तता केली.

यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. सुमित लवटे, ॲड. फैयाज शेख, यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here