मुंबई,दि.२: Raj Thackeray On Ajit Pawar: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले “मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.” होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही.” असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे.
महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर राज ठाकरे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ‘आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला.’ असे ट्विट ठाकरे यांनी केले आहे.
राज ठाकरे यांचे ट्विट | Raj Thackeray On Ajit Pawar
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.
ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.
बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?
असे ट्विटमध्ये राज ठाकरे यांनी म्हटले आहे.