पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार

0

करमाड,दि.२३: शिवीगाळ केल्याप्रकरणी पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. पालकमंत्री संदिपान भुमरे व छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दरखवाडी येथील बाबासाहेब वाघ यांच्यातील संवादाची एक क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. दरम्यान, या तरुणाने गुरुवारी संध्याकाळी करमाड पोलीस स्टेशनमध्ये पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या विरोधात शिवीगाळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. 

बाबासाहेब रामराव वाघ या तरुणाने पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांच्या विरोधात काही आरोप केल्याने पालक मंत्री संदिपान भुमरे यांनी या तरुणास फोन करून शिवीगाळ केल्या प्रकरणाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर दरखवाडी येथील बाबासाहेब वाघ या तरुणाने गुरुवारी संध्याकाळी करमाड पोलीस स्टेशनमध्ये शिवीगाळ केल्याप्रकरणीचा तक्रार अर्ज दिला असून करमाड पोलिसांमार्फत अर्ज प्राप्त झालेला असल्याचे कळविण्यात आले. हा तरुण विधानसभा मतदारसंघ पैठण व छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील दरकवाडी येथील रहिवासी असून सध्या तो संभाजीनगर येथे वास्तव्यास आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here