मुंबई,दि.९: अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अनेक आमदारांनी अजित पवारांबरोबर जाणे पसंद केले आहे. अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर शरद पवारांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. अशातच अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांवर विश्वास दाखवत त्यांच्याबरोबर जाणे पसंद केले आहे. (NCP Crisis)
शरद पवार यांना मोठा धक्का
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत अजित पवार सत्तेत सहभागी झाले. यानंतर अजित पवार यांनी पक्षावर दावा केला असून, शरद पवार यांनी राज्यचा दौरा सुरू केला आहे. शरद पवार यांना एकामागून एक धक्के बसत असल्याचे दिसत आहे. आता एका माजी मंत्र्यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे. (NCP Crisis)
मिळालेल्या माहितीनुसार, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी आपल्या पन्नास मुख्य पदाधिकाऱ्यांसह सामुहिक राजीनामा दिला आहे.सुबोध मोहिते हे रामटेकमधून खासदार होते. राजीनामा देताना आपण विकासाच्या मुद्द्यावर अजित पवार यांना पाठिंबा देत असल्याचे माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सुबोध मोहिते यांनी आपल्या पदाधिकांऱ्यासह राजीनामा दिला. मोहिते यांच्या या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीचे आणखी काही मोठे नेते, पदाधिकारी राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवारांना वाढता पाठिंबा
अजित पवार यांनी शिवसेना भाजप यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले. अनेक आमदार अजित पवार यांना पाठिंबा देत आहेत. तर अनेकांनी शरद पवार यांना पाठिंबा देत असल्याचे सांगून अजित पवार यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा पक्ष बांधणी करण्यासाठी राज्यभर दौरे सुरू केले आहेत.