सोलापूर,दि.४: बाळासाहेबांची शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी आमदार प्रणिती शिंदे या हिंदू विरोधी असल्याचे म्हटले आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली होती.
मुंबईतील एका महिला पत्रकाराने संभाजी भिडे यांना प्रश्न विचारला हाेता. या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी त्यांनी आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बाेलताे, असा सल्ला दिला हाेता. आमदार प्रणिती शिंदे गुरुवारी भारत जाेडाे यात्रेतील सहभागाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना भिडे यांच्या विधानावर प्रतिक्रिया विचारण्यात आली.
हेही वाचा मनिष काळजे यांचा उद्धव सेनेला मोठा धक्का, शिवसेनेच्या 15 पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा
महिलांचे काम आणि त्यांचे कर्तृत्व बघा. केवळ त्यांच्या चेहऱ्यांकडे बघून भेदभाव करण्याची मानसिकता बदला, असं म्हणत काॅंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर टीका केली.
भिडे गुरुजी यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रणिती शिंदे यांनी असे बोलणे हे स्वाभाविकच आहे. कारण ते हिंदुत्ववादी विरोधी आहेत. या अगोदर देखील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भगवा दहशतवाद असे देखील म्हटलेले असल्यामुळे हे काय नवीन नाहीये. ते हिंदू विरोधी आहेत हे अजून एकदा सिद्ध झालंय. असे म्हणत मनिष काळजे यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली आहे.