मंत्री छगन भुजबळ यांनी दिले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना चॅलेंज म्हणाले…

0

मुंबई,दि.6: राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना चॅलेंज दिले आहे. ‘टीव्ही 9 मराठी’चा कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका करत विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे करून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. मनोज जरांगे हे विधानसभा निवडणुकीसाठी 288 उमेदवार उभे करण्यासाठी चाचपणी करत आहेत. मराठा आरक्षणावरून त्यांनी आक्रमक भूमिका घेत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून भुजबळ यांना प्रश्न एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी खुलं आव्हान दिल्याचे पाहायला मिळाले.

काय म्हणाले छगन भुजबळ?

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना मनोज जरांगे पाटील यांनी रोज भूमिका बदलू नये. 288 उमेदवार तुम्ही उभे करणार आहात. तुमच्या हिंमत असेल तर 288 उमेदवार उभे करा, असे म्हणत भुजबळांनी खुलं आव्हान दिलं आहे. तर प्रत्येकवेळी कशाला भूमिका बदलता. उपोषणाला बसतो म्हणतात आणि उठता. आता जरांगे मुस्लिमांनीही आरक्षण द्या म्हणत आहेत.

परंतु मुस्लीम समाजाला महाराष्ट्रात 25 वर्षापूर्वी आरक्षण दिलं. इकडे माळी समाज, तिकडे बागवान, इकडे खाटीक तिकडे कुरेशी, इकडे कासार तिकडे मण्यार असं मुस्लीम समाजाला आरक्षण दिलंय. पण माहिती नसलेल्या गोष्टी अर्धवट माहिती असणारे लोक बोलतात. मध्येच बोलतात मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार, मी हे करणार वैगेरे…तू एकच काम कर 288 जागा लढव असं त्यांनी म्हटलं. टीव्ही 9 च्या कार्यक्रमात भुजबळांनी हे विधान केले आहे. 

तसेच माझ्यासमोर मनोज जरांगेंनी स्वत: निवडणुकीत उभं राहावे. माझ्यासमोर उभं राहावे ही माझी इच्छा आहे. मला पाडले तरी माझा आवाज बंद होणार नाही. ओबीसींचे आरक्षण आणि त्यांचे संरक्षण करणे हे माझे काम आहे. येवला मतदारसंघात कुणीही लढावं मी त्याच्याविरोधात 1 लाख मतांनी निवडून येईल असा विश्वास छगन भुजबळांनी व्यक्त केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here