सोलापूर,दि.11: मोदी@9: भारतीय जनता पार्टीच्यावतीने देशभरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामाचा प्रसार सामान्य जनतेमध्ये करण्यासाठी मोदी@9 अभियानाची सुरुवात 1 जून ते 30 जून दरम्यान करण्यात आली असून याचा शुभारंभ सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात प्रभाग क्रमांक 3 येथे सोमपा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी युवा संपर्क अभियानाच्या माध्यमातून केला.
मोदी@9
भवानी पेठेतील अथर्व गार्डन येथे सुरेश पाटील यांनी युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळावा व मोदी सरकारने युवकांसाठी 9 वर्षात केलेली कामगिरी याची माहिती दिली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवर भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते धनाळे,सुरेश पाटील, हेमंत पिंगळे, उद्योजक केशव चाटला, अमर बिराजदार यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय अंजिखाने यांनी केले व सुरेश पाटील यांचे कौतुक करताना म्हणाले की, सोलापुरातील तरुणाई रोजगारासाठी वणवण भटकत असून आपण रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेला हा उपक्रम हा आदर्श उपक्रम असून येणाऱ्या काळात आपण अनेक कंपन्या सोलापूरात आणून सोलापुरातील तरुणांचा लोंढा बाहेर जाण्याचे थांबवावे अशी विनंती केली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हेमंत पिंगळे यांनी कार्यक्रमात मोदी@9 अभियानाची माहिती उपस्थित तरुणांना दिली व केंद्र सरकारने गेल्या 9 वर्षात तरुणांसाठी कोणत्या योजना आणल्या व कौशलय विकास योजनेच्या माध्यमातून कशा पद्धतीने तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला, याची माहिती दिली व याच बरोबर मोदी सरकारच्या काळात युवकांसाठी अनेक क्षेत्रात नौकऱ्या उपल्बध होत असून, येणाऱ्या काळात बेरोजगारी संपुष्टात येण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
काय म्हणाले सुरेश पाटील?
कार्यक्रमाचे आयोजक सुरेश पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आमचा भवानी पेठ भाग हा कामगार बहुल भाग असून आमच्या प्रभागात अनेक तरुण शिकलेले असून देखील त्यांना नौकरी नसल्याने, त्यांचे पालक नेहमी त्यांची मुलांची व्यथा आम्हाला सांगत असतात व आमच्या मुलांना जर रोजगार मिळाला तर आमचे कुटुंब व्यवस्थित चालेल ही, तळमळ पाहून मी हा रोजगार मेळावा घेण्याचे ठरविले. आज फक्त एकच आर्मेका फायनान्स कंपनी आम्ही बोलावली असून येणाऱ्या काळात सर्व क्षेत्रातल्या कंपनीना बोलावण्याचे आमचे नियोजन असल्याचे सांगितले.