Karnataka: लिंगायतांना बाजूला केले भाजपने राज्य गमावले; कर्नाटक निवडणूक 9 जिल्ह्यातून भाजपा हद्दपार

0

बंगळुरु,दि.14: Karnatka कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Election 2023) काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले. लिंगायतांना बाजूला केले भाजपने राज्य गमावले. कर्नाटक निवडणूक 9 जिल्ह्यातून भाजपा पक्ष हद्दपार झाला आहे. माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा आणि जगदीश शेट्टर, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी या लिंगायत समाजाच्या ‘पॉवरफुल’ नेत्यांना बाजूला करणे भाजपला भोवले. स्वतंत्र लिंगायत धर्माला मान्यता देण्याचा प्रस्ताव फेटाळण्याच्या  भूमिकेचाही फटका बसल्याचे दिसते. 

लिंगायतांना बाजूला केले भाजपने राज्य गमावले | Karnataka Election 2023

लिंगायतांची लोकसंख्या 17 टक्के असून, 14 जिल्ह्यांत त्यांचा प्रभाव आहे. भाजपने येदियुरप्पा आणि शेट्टर यांना वयाचे कारण देत बाजूला केले होते. पण, येदियुरप्पा सोबत नसतील तर लिंगायत मते काँग्रेसकडे वळू शकतात, याची जाणीव झाल्याने भाजपने नंतर त्यांना काही जबाबदारी दिली. परंतु त्यांचे खच्चीकरण स्पष्ट दिसून आले. तिकीट नाकारल्याने शेट्टर व सवदी काँग्रेसमध्ये गेले. 

लिंगायत समाजाची नाराजी वाढली

भाजपने मुस्लिमांचे चार टक्के ओबीसी आरक्षण रद्द करून लिंगायत व वक्कलिगांना विभागून दिले. पण, स्वतंत्र लिंगायत धर्माला मान्यता देण्याऐवजी भाजपने हिंदुत्वावर भर दिला. लिंगायतांऐवजी सगळे हिंदू एकत्र करून राजकारण करू, अशी जाहीर भूमिका घेतली. परिणामी, लिंगायत समाजाची नाराजी वाढली.

9 जिल्ह्यातून पार हद्दपार

कर्नाटकमधील भाजप सरकार 40 टक्के कमिशनच्या आरोपांनी पार रसातळाला गेलेल्या भाजपला कर्नाटक विधानसभेमध्ये एवढ्या दारुण आणि एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागेल, याची कल्पना देखील भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासह राज्यांतील नेतृत्वाने केली नसेल. मात्र, ज्या पद्धतीने भाजपचा दारुण पराभव कर्नाटकच्या निवडणुकीनंतर झाला आहे तो त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असेल यात शंका नाही. स्थानिक मुद्यांना हद्दपार करुन राष्ट्रीय मुद्यांवरुन आणि एकच चेहरा सगळीकडे घेऊन मिरवणाऱ्यांना मतदारांनी एकप्रकार चपराक देत जमिनीवर आणण्याचे काम केले आहे. कर्नाटकी जनतेने काँग्रेसला प्रचंज बहुमताने एकहाती सत्ता दिली. मात्र, भाजपला तब्बल 9 जिल्ह्यातून पार हद्दपार करुन टाकले आहे. ज्या ठिकाणांवर भाजपला मोठ्या अपेक्षा होत्या त्या ठिकाणीसुद्धा कर्नाटकी जनतेने भाजपला अस्मान दाखवले आहे. जुन्या मैसूरच्या मतदारांकडून भाजपला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, तिथेही पराभव चाखावा लागला आहे.

मध्य कर्नाटकमध्ये भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. नऊ जिल्ह्यांमध्ये भाजपला खाते सुध्दा उघडता आलेलं नाही, इतकी दूरवस्था मतदारांनी करुन टाकली आहे दुसऱ्या आठ जिल्ह्यांमध्ये केवळ एका स्थानावर समाधान मानावे लागले आहे. उर्वरित सात जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहेत. एकूण 24 जिल्ह्यांमध्ये भाजपची तीन भागांमध्येही खराब कामगिरी केली आहे. त्यामुळे पराभवाची व्याप्ती वाढली आहे. केवळ बंगळूर शहर, बेळगाव, बिदर, उडपी शहरांमध्ये भाजपला यश मिळाले आहे. चिकमंगळूर, बळ्ळारी, कोडगू या भाजपच्या बालेकिल्ल्यामध्येही दाणादाण झाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here