कोरोना लस नवीन JN.1 सब-व्हेरियंटवर किती प्रभावी?

0

मुंबई,दि.27: देशातील अनेक राज्यांमध्ये वेगाने कोरोना (Corona) रुग्ण वाढत आहेत. देशामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 चा फैलाव होत असल्याने पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. कोरोनाची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढली आहे. देशात सध्या कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहेत. कोरोनाचा नवीन सब-व्हेरियंट हात-पाय पसरताना दिसत आहे. सध्या देशात चार हजारहून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण असून यातील बहुतेक रुग्ण नवीन कोरोना व्हेरियंटचे आहेत. यामुळे केंद्र सरकार अलर्टवर असून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं जात आहे. केंद्र सरकारने राज्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

डोकेदुखी वाढली

देशात कोरोनाचा नवीन व्हेरियंट काही राज्यांमध्ये परसला आहे, पण त्याव्यतिरिक्तही आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशासह जगभरात जोरदार तयारी सुरु असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंतेचं वातावरण आहे. कोरोनाचा नवीन JN.1 सब-व्हेरियंट हा कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार आहे. देशात गेल्या 24 तासांत 74 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील JN.1 सब-व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 63 वर पोहोचली आहे. 

कोरोना लस किती प्रभावी?

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने डोकं वर काढल्यामुळे आता कोरोना लस या व्हेरियंटवर किती प्रभावी आहे आणि कोरोना लसीचा बूस्टर डोस घेण्याची गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित आहे. तज्ज्ञांचं यावर काय मत आहे जाणून घ्या. JN.1 सब-व्हेरियंटचा वाढता धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना कोरोना प्रकरणांमध्ये संभाव्य उद्रेकासाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी याबाबत म्हटलं आहे की, ‘नवीन कोरोना सब-व्हेरियंट प्रकार JN.1 वेगाने पसरत आहे पण यामुळे रुग्णांची स्थिती गंभीर नाही. त्याशिवाय रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाणही वाढलेलं नाही. कोरोनाचा नवीन JN.1 व्हेरियंट जास्त संसर्गजन्य असून अधिक वेगाने पसरत आहे.” दरम्यान, हा व्हेरियंट सौम्य असल्याचंही सांगितलं जात आहे.

लसीची गरज आहे का?

डॉ. गुलेरिया यांनी पुढे म्हटलं आहे की, ‘आपल्याला अशा लसीची गरज आहे, जी कोरोना व्हायरसच्या कोणत्याही प्रकारावर प्रभावी ठरेल आणि संरक्षण देऊ शकेल. JN.1 हे Omicron चे एक उप-प्रकार आहे ज्यामध्ये उत्परिवर्तन झाले आहे, त्यामुळे Omicron विरुद्ध तयार केलेली लस या प्रकारावर देखील प्रभावी होईल. नागरिकांची सध्याची प्रतिकारशक्ती किती आहे या माहितीच्या आधारे नवीन लस किंवा बूस्टर डोसची गरज आहे की नाही, हे ठरवता येईल.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here