मुंबई,दि.24: DMK खासदार दयानिधी मारन (Dayanidhi Maran) यांनी हिंदी भाषिक लोकांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यूपी आणि बिहारचे लोक तामिळनाडूत येतात आणि ते रस्ते सफाईचे आणि शौचालय सफाईचे काम करतात असं वादग्रस्त वक्तव्य तामिळनाडूचे खासदार दयानिधी मारन यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर उत्तर भारतातून निषेधाची प्रतिक्रिया येत आहे. तसेच भाजपनेही त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे.
तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष द्रमुकचे (DMK) खासदार दयानिधी मारन यांनी उत्तर भारतीयांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील हिंदी भाषिक लोक तामिळनाडूत येतात आणि बांधकाम कामगार म्हणून काम करतात किंवा रस्ते आणि शौचालये साफ करतात.
दयानिधी मारन कोण आहेत?
दयानिधी मारन हे तामिळनाडूचे प्रसिद्ध राजकीय नेते आहेत. ते तामिळनाडूतून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले. दयानिधी मारन द्रविड मुनेत्र कळघमचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचा जन्म जहागीर येथे झाला. मारन यांना राजकारणाचा वारसा असून त्यांचे वडील मुरासोली मारन हे 36 वर्षे केंद्रात खासदार आणि मंत्री होते. तर त्यांचे आजोबा एम करुणानिधी यांच्या द्रमुकचे अध्यक्ष होते.