नवी दिल्ली,दि.17: पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले आहे. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. भाजपाने यावेळी अब की बार 400 पार असा नारा दिला आहे. विरोधी पक्षांनी जोरात प्रचार सुरू केला आहे. मात्र अनेकवेळा बोलताना असभ्य शब्दांचा वापर केला जातो.
झारखंडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. JMM नेते नजरुल इस्लाम यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. या वक्तव्यावरून नजरूल यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, भाजपने त्यांच्या या वक्तव्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे.
इंडिया आघाडीवर भाजपाने पंतप्रधान मोदींवर जिवघेणा हल्ला करण्याचा कट रचल्याचा आरोपही केला आहे. तसेच, आपण पंतप्रधानांविरोधात कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह विधान केलेले नाही. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे, असे नजरुल इस्लाम यांनी म्हटले आहे.
गुन्हा दाखल
यासंदर्भात पोलिसांनी नजरुल इस्लामविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ते म्हणताना दिसत आहेत की, ‘नरेंद्र मोदी यांच्या आत्म्यात आता हळुहळू हिटलर बसताना दिसत आहे. त्याला राज्यघटना बदलायची आहे. आम्ही 400 पार जाऊ, अशी घोषणा त्याने दिली आहे. आज मी तुम्हाला सांगतो, 400 जागा नाही, तर नरेंद्र मोदीला 400 फूट आत गाडले जाईल.” यानंतर उपस्थित लोक टाळ्या वाजवतात.








