मुंबई,दि.19: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एनडीएचा उल्लेख करत गौप्यस्फोट केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 240 जागा मिळाल्या आहेत. एनडीएला बहुमत मिळाल्याने नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. एनडीएमधील मित्र पक्षांच्या टेकूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार उभे आहे.
सरकारला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागेल. त्यामुळे एक छोटीशी जरी गडबड झाली तरी मोदी सरकार कोसळेल, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. मोदी सरकारमध्ये मोठय़ा प्रमाणात असंतोष आहे. त्यामुळे एनडीएतील काही लोक आमच्या संपर्कातत आहेत, असा गौप्यस्फोटही राहुल गांधी यांनी केला आहे.
लोकसभा निवडणूक निकालानंतर राहुल गांधींनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. निवडणूक निकालामुळे मोदींची विचारधारा संपली आहे. भाजपचा मूळ पाया आणि धार्मिक द्वेष पसरवण्याची त्यांची विचारधाराही डळमळीत झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
काही लोक आमच्या संपर्कात
भाजपच्या खासदारांची संख्या कमी आहे. मित्र पक्षांच्या टेकूवर मोदींचे सरकार आहे. एका जरी मित्र पक्षाने भूमिका बदलली तर हे सरकार पडेल. एक छोटीशी गडबड झाली तरी सरकार कोसळू शकते. मोदींच्या गटातही मोठा असंतोष आहे. त्यामुळे एनडीएतील काही लोक आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राहुल गांधींनी केला.