मुंबई,दि.22: अभिनेते दलीप ताहिल यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेते दलीप ताहिल यांना पाच वर्षांपूर्वीच्या एका केसप्रकरणी मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दलीप ताहिल ते 65 वर्षांचे आहेत. 2018 मध्ये घडलेल्या ड्रंक अँड ड्राईव्ह केसप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
2018 मध्ये मुंबईतील खार भागात अभिनेते दलीप ताहिल कार चालवत असतानाच त्यांनी एका रिक्षाला धडक दिली. यामुळे रिक्षात असलेली महिला जखमी झाली होती. धडक दिल्यानंतर दिलीप ताहिल यांनी तिथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र थोडं पुढे गेल्यावर गणपती विसर्जनाची मिरवणूक असल्याने ते अडकले. रिक्षाचालक त्यांचा पाठलाग करत असल्याने ते पडकले गेले. त्यांना कारमधून बाहेर येण्यास सांगितलं तर अभिनेत्याने रिक्षाचालक आणि त्या महिलेशी हुज्जत घातली. यानंतर त्यांना पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली गेली. अभिनेत्याने ब्लड टेस्ट देण्यास नकार दिला. मात्र नंतर ते नशेत असल्याचंही समोर आलं. दलीप ताहिल यांना अटकही करण्यात आली होती. मात्र लगेच त्यांची जामिनावर सुटका झाली होती.
दलीप ताहिल गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. त्यांनी ‘बाजीगर’, ‘कहो ना प्यार है’, ‘सोल्जर’, ‘इश्क’, ‘रा.वन’ सारख्या अनेक सिनेमांत काम केले आहे. त्यांना खलनायक भूमिकांसाठीच जास्त ओळखलं जातं. आता दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्याने ते चर्चेत आले आहेत.