Kumbam Shivakumar Reddy: काँग्रेस नेते कुंभम शिवकुमार रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल

0

मुंबई,दि.29: काँग्रेस नेते कुंभम शिवकुमार रेड्डी (Kumbam Shivakumar Reddy) यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये एका काँग्रेसच्या नेत्यावर महिलेने बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असून कुंभम शिवकुमार रेड्डी यांना ताब्यातही घेण्यात आले आहे. रेड्डी हे तेलंगणातील आहेत. 

काँग्रेस नेते कुंभम शिवकुमार रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल | Kumbam Shivakumar Reddy

तेलंगणाच्या नारायणपेट जिल्ह्याचे रेड्डी हे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी बंगळुरुतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये महिलेवर बलात्कार केला, असा आरोप करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या शिवकुमार रेड्डी यांच्यावर गेल्या वर्षी देखील एका महिलेने असाच हॉटेलमध्ये बोलवून बलात्कार केल्याचा आरोप केलेला आहे. 

कर्नाटक पोलिसांनी तेलंगणा काँग्रेसचे नेते कुंभम शिवकुमार रेड्डी यांना ताब्यात घेतले आहे. एका महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. रेड्डी यांनी बेंगळुरूमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा दावा महिलेने केला होता. 

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, रेड्डी यांनी तिला एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बोलविले होते. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. तसेच तिच्यावरील बलात्काराचा व्हिडीओ बनविण्यात आला आहे, फोटोही काढण्यात आले आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ  व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here