बीड,दि.१६: भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात (Terrible accident due to loss of control of the vehicle) दोन जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी (Two killed, one seriously injured) झाला आहे. बीड परळी महामार्गावर परळीकडुन भरधाव वेगात येणाऱ्या स्वीप्ट डिझायर (Swift Dzire) कारची बाभळीच्या झाडाला जोरात धडक बसुन अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी तेलगाव येथे घडली. हा अपघात एवढा भीषण होता की यात गाडीचा पुर्ण चक्काचुर होऊन, मयत व जखमींना जेसीबीच्या सहायाने बाहेर काढण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील तीन तरूण रविवारी एम. एच.१३ सीके ०४४१ या स्वीप्ट डिझायर गाडीने भोकर येथुन तेलगाव मार्गे बीडला जात असताना तेलगाव येथे परळी रोडवर असलेल्या अमर बिअरबारजवळ सदर गाडी आली असता चालकाचे स्टेरिंगवरील नियंञण सुटल्याने गाडी रोडच्या लगत खड्यात असलेल्या बाभळीच्या झाडाला जाऊन धडकली. गाडी एवढ्या जोरात धडकली की पूर्वेकडून येणारी गाडी धडक बसताच मोठ्या वेगाने फिरून गाडीची समोरील तोंड उत्तरेकडे झाले. या अपघातात चालक व चालकाच्या बाजूच्या सिटवर बसलेला तरूण जागीच ठार झाले. मागच्या सिटवर बसलेला तरूण समोरच्या व मागच्या सिटमध्ये अडकला.
मयत व जखमी नांदेड जिल्ह्यातील भोकरचे असुन, नेमके कुणाचे नाव काय आहे याची ओळख पटत नाही. तरीही त्या तरूणांच्या मोबाईलवर आलेल्या फोनच्या अंदाजावरून मयतात युनुस शेख व सचिन मोकमपल्ले यांचा समावेश असल्याचा अंदाज वर्तवला जात असुन अमोल वाघमारे हा तरूण गंभीर जखमी झाल्याचे समजते. त्या तरूणाचे पाय मोडला. गावालगतच अपघात झाल्याने अमर बिअरबारचे मालक कांता पाटील लगड हे इतर नागरिकांना घेऊन तात्काळ घटनास्थळी गेले.
गाडीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु ते बाहेर काढता येत नव्हते. त्यामुळे गॅस वेल्डिंग ने वेल्डिंग करून, एका मयतास बाहेर काढले. तर जखमी व अन्य एका मयतास जेसीबीच्या सहायाने पोलीस कर्मचारी व नागरिकांनी बाहेर काढले.यानंतर मयत व जखमींना १०८ रूग्ण वाहिकेने रूग्णालयात दाखल करण्यात आले.