Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला

0

मुंबई,दि.16: Saif Ali Khan Knif Attack: बॉलिवूडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. रात्री 2 वाजता चोरट्याने घरात घुसून सैफ अली खानवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याच्या शरीरावर 2-3 वेळा हल्ला करण्यात आला. अभिनेता सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहे. हल्ला कोणी आणि का केला याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

मुंबई पोलीस काय म्हणाले?

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत मुंबई पोलिसांनी सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने अभिनेत्याच्या घरात प्रवेश केला. यानंतर सैफ आणि घुसखोर यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी त्याने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे.

करीना कपूर कुठे होती?

हल्ल्याच्या वेळी कुटुंबातील इतर सदस्य कुठे होते याची माहिती सध्या उपलब्ध नाही. पण करिश्मा कपूरने 9 तासांपूर्वी इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. तिने बहीण करीना कपूर, मैत्रिणी रिया आणि सोनम कपूरसोबत पार्टी केली. तिघांनी एकत्र जेवणाचा आनंद लुटला. करिनाने बहीण करिश्माची ही पोस्ट तिच्या अकाऊंटवर पुन्हा शेअर केली आहे. मात्र, सैफवर झालेल्या हल्ल्याच्या वेळी करीना तिच्या मैत्रिणीं सोबत होती की घरी पोहोचली होती, याबाबत कोणतीही पुष्टी मिळालेली नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here