CID ने सांगितले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं कारण

0

बीड,दि.15: CIDने (सीआयडी) न्यायालयात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं कारण सांगितले आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हे खंडणी मिळवताना अडथळा ठरत असल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा सीआयडीने केला आहे. tv9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे. देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला बीड सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयात युक्तिवाद करताना सीआयडीने मोठा दावा केला. 

अवदा कंपनीकडून मागितलेली खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला बीड कोर्टात आज हजर करण्यात आलं. tv9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार यावेळी सीआयडीने कोर्टात जवळपास 9 महत्त्वाचे मुद्दे मांडले. 

संतोष देशमुख हे अवदा कंपनीकडून खंडणी मिळवताना मोठा अडथळा ठरत होते. याच कारणावरून वाल्मीक कराड आणि इतर आरोपींनी आधी त्यांचं अपहार आणि नंतर हत्या केली, असा दावा सीआयडीने न्यायालयात केला.

सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी अवदाच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही कंपनीने त्यांना खंडणी दिली नव्हती. अवादा कंपनीची बाजू घेत संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलं होतं. खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केली, असा दावा सीआयडीने आणि एसआयटीने कोर्टात केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here