Road Hypnosis रोड हिप्नोसिस म्हणजे काय? यामुळे होतात अपघात

0

मुंबई,दि.१: Road Hypnosis रोड हिप्नोसिस म्हणजे काय? यामुळे अपघात होतात. अलीकडच्या काळात समृध्दी महामार्गावर (Samriddhi Mahamarg) अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावरील रस्ते एक सारखे असतात. बऱ्याचदा Road Hypnosis रोड हिप्नोसिसमुळे अपघात होतात. बऱ्याचदा दुरचा प्रवास केल्यानंतर आपण येथे कसे आलो हे आठवत नाही. दूरच्या प्रवासात रस्ते सारखे दिसतात, रस्ते ओळखता येत नाहीत. किंवा वाहन चालवत असताना बेधुंद म्हणजेच नजर शून्यात गेल्यासारखे वाटते आणि आपण वाहन चालवत राहतो. इथे धोका खरा आहे, लक्षात घ्या. यामुळे रोड हिप्नॉटिझम म्हणजे काय ते जाणून घेणे महत्वाचे आहे. त्यापासून कसा बचाव करता येईल हे पाहणे आवश्यक आहे. (What is Road Hypnosis?)

हेही वाचा Samriddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात प्रवासी बसने पेट घेतल्याने २५ जण मृत्यूमुखी

Road Hypnosis रोड हिप्नोसिस

दूरवरच्या प्रवासात काही काळानंतर वाहनचालकाला थोडे थांबणे गरजेचे आहे. सलग वाहन चालवणे धोकादायक आहे. टाटाच्या कारमध्ये एक फिचर आहे. काही ठराविक वेळ सलग गाडी चालविली की टाटाच्या स्क्रीनवर एक विश्रांती घेण्याचा सल्लावजा मेसेज येतो. इतरही गाड्यांमध्ये असेल हे, परंतू हे काय आहे. तर परदेशात प्रचलित असलेल्या रोड हिप्नॉटिझम स्थितीपासून वाचण्यासाठी हा मेसेज असतो. सतत गाडी चालवून आपल्याला आपल्य़ा समोर चलचित्र पाहिल्यासारखे होते. यात आपण गुरफटून जातो आणि पुढे अपघाताची शक्यता असते. काय प्रकार असतो हा? 

Road Hypnosis

रोड संमोहन किंवा रोड हिप्नोसिस नेमके काय? | What is Road Hypnosis?

रोड संमोहन ही एक शारीरिक स्थिती आहे जी बहुतेक ड्रायव्हर्सना लक्षात येत नाही किंवा त्यांना माहिती नसते. रोड हिप्नोसिस रस्त्यावर वाहन चालविण्यास सुरुवात केल्यानंतर 2.5 तासांनी सुरू होते, संमोहित चालकाचे डोळे उघडे असतात, परंतु मेंदू जे काही पाहतो ते रेकॉर्ड आणि विश्लेषण करत नाही. रोड संमोहन हे तुमच्या समोर उभ्या असलेल्या वाहनाला किंवा ट्रकला मागील बाजूस अपघात होण्याचे पहिले कारण आहे. रोड हिप्नोसिस असलेल्या ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नाही. तो किती किमी वेगाने जात आहे, किंवा त्याच्या समोरच्या कारचा वेग, सहसा टक्कर 140 किमीच्या वर असते याचे विश्लेषण करू शकत नाही.

असा करा उपाय

रोड हिप्नोसिसपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, दर 2.5 तासांनी थांबणे, चालणे, चहा किंवा कॉफी पिणे आवश्यक आहे. लांब रस्त्यावर रोड संमोहनपूर्वी काही काळ चलचित्र बघितल्या सारखे वाटून नुसते बघत रहातो. तुमच्यासोबतही हा प्रकार अनेकदा घडला असेल. याला झोप किंवा डुलकी म्हणत नाहीत. असे प्रकार हायवेवर होतात, कारण सगळीकडे रस्ता सारखाच असतो.

वाहन चालवताना काही ठिकाणे आणि वाहने लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्हाला शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नसेल, तर याचा अर्थ तुम्ही स्वत:ला आणि प्रवाशांना मृत्यूकडे नेत आहात. रोड संमोहन रात्रीच्या वेळी अधिक वेळा घडते आणि प्रवासी देखील झोपलेले असल्यास, परिस्थिती खूप गंभीर होते. चालकाने थांबावे, विश्रांती घ्यावी, दर 2.5 तासांनी 5-6 मिनिटे चालावे आणि आपले मन मोकळे ठेवावे.

डोळे उघडे असले तरी जर का मन बंद असेल तर अपघात अटळ आहे. गाडी चालवता चावलता ब्लँक होणे थांबवा, क्षणभर गाडी बाजूला घेऊन दीर्घ श्वास घ्या आणि फ्रेश होऊन इकडे तिकडे बघत परत ताजेतवाने होत वाहन चालविण्यास सुरुवात करा. थांबल्याने वेळ जातो, म्हणून दुर्लक्ष करू नका. न जाणो यामुळे तुम्ही ती वेळ टाळू शकाल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here