Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले स्पष्ट आदेश

0

मुंबई,दि.5: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना स्पष्ट आदेश दिले आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत राज्यात सत्तांतर घडवून आणले. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकारला तीन महिने पूर्ण झाले आहे. दर दुसरीकडे, विरोधकांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका लागणार असून कामाला लागा, असे आदेश शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले आहे.

उद्धव ठाकरेंनी आज विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मोठा दावा केला आहे. कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहे.

मागील 3 महिन्यांचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. गुजरात निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील 4 मोठे प्रकल्प हे गुजरातला गेले आहे. राज्यातील लोकांना विश्वास देण्यासाठी मोदींनी दोन पॅकेजची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले पाहिजे, सर्वांनी तयारीला लागावे, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहे, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी दिली.

दरम्यान, शिर्डीमध्ये मंथन शिबिरामध्ये बोलत असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मोठा दावा केला आहे. शिर्डीत काँग्रेसचे शिबीर झाले आणि सरकार पडलं होतं. आता राष्ट्रवादीचं झाल्यानंतर ही तसंच होवू शकतं. कारण एकनाथ शिंदेंचं सरकार पडायला पुढे आले आहे, असा दावाच पाटील यांनी केला आहे.

तसंच, सत्ता गेलीय म्हणून चिंता करू नका. आपल्याला गर्दीची हाव नाही. आगामी काळात आपण महाराष्ट्रातले चित्र पालटून टाकू. आम्ही आघाडी करणार आहोत. जर 114 जागा लढवल्या तर किमान 100 निवडून आणायच्या आहेत, असं म्हणत पाटील यांनी आघाडीचे संकेत दिले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here