Home आंतरराष्ट्रीय पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे खळबळजनक विधान: “आम्ही हिंदू पूर्वजांचा द्वेष करतो, मुलांना खोटा...

पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे खळबळजनक विधान: “आम्ही हिंदू पूर्वजांचा द्वेष करतो, मुलांना खोटा इतिहास शिकवला जातोय”

0

मुंबई,दि..२८: Pakistan History Controversy | पाकिस्तानात सध्या इतिहासावरून एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. “पाकिस्तानी मुलांना शाळांमध्ये चुकीचा इतिहास (Distorted History) शिकवला जात असून, देशातील जनता आपल्या खऱ्या मुळांपासून (Roots) दूर जात आहे,” असे खळबळजनक विधान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री (Defense Minister) ख्वाजा आसिफ यांनी केले आहे.

“माझे पूर्वज हिंदू होते, मग मी कमी पाकिस्तानी ठरतो का?” Pakistan History Controversy

एका जाहीर मुलाखतीत (Interview) बोलताना ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानी मानसिकतेवर थेट बोट ठेवले. ते म्हणाले, “आम्ही पाकिस्तानी मुस्लिम आपल्या हिंदू पूर्वजांचा (Hindu Ancestors) द्वेष करतो. पाकिस्तानमधील निम्मे लोक आपले पूर्वज सौदी अरेबिया किंवा इराणमधून आल्याचा खोटा दावा करतात. नवी पिढी आपल्या मूळ संस्कृतीच्या अस्मितेपासून (Cultural Identity) दुरावली जावी, याच उद्देशाने हा विचार जाणूनबुजून पसरवला गेला आहे.”

पुढे बोलताना त्यांनी पाकिस्तानातील इतिहास लेखन आणि पुस्तकांवर (Textbooks) गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “पाकिस्तानातून हिंदू शासकांचा इतिहास जवळपास पुसून टाकण्यात आला आहे. चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक हे हिंदू होते, म्हणूनच त्यांचा इतिहास पाठ्यपुस्तकांतून हटवला गेला. माझे स्वतःचे पूर्वज हिंदू होते; मग यामुळे मी कमी पाकिस्तानी ठरतो का?” असा परखड सवाल त्यांनी केला. विशिष्ट मानसिकतेच्या लोकांनीच ही पुस्तके लिहिल्याचा आरोपही त्यांनी केला.

अमेरिकेच्या युद्धात वापर करण्यासाठी इतिहास बदलला (Geopolitics & History)

संरक्षण मंत्र्यांच्या मते, सध्याच्या पाकिस्तानी समाजाची मानसिकता पूर्णपणे बदलली आहे. अमेरिकेच्या युद्धांमध्ये (US Wars) पाकिस्तानचा वापर करून घेण्यासाठी त्यानुसारच इतिहासाची मांडणी बदलण्यात आली. आज परिस्थिती अशी आहे की, पाकिस्तानातील तरुण पिढीला चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक कोण होते, हे देखील माहीत नाही. अमेरिका आणि इस्रायलच्या मुद्द्यावरून ख्वाजा आसिफ आधीच वादात असताना, आता त्यांच्या या नव्या विधानामुळे पाकिस्तानात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता आहे.

“इस्रायलला कधीच मान्यता देणार नाही” (Pakistan-Israel Relations)

अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पाकिस्तानसह अनेक मुस्लिम देशांना ‘अब्राहम करारात’ (Abraham Accords) सामील होण्याचे आणि इस्रायलला मान्यता देण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची भूमिका स्पष्ट करताना आसिफ म्हणाले, “माझ्या वैयक्तिक मतानुसार, पाकिस्तान देशाच्या मूळ विचारधारेच्या (Ideology) विरोधात जाऊन अशा कोणत्याही करारात सहभागी होणार नाही.”

१९६७ च्या सीमेवर आधारित, पूर्व जेरुसलेम (East Jerusalem) ही राजधानी असलेले एक स्वतंत्र पॅलेस्टिनी राज्य (Independent Palestinian State) अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत इस्लामाबाद इस्रायलला अधिकृत मान्यता देणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. पाकिस्तानने आपल्या ७८ वर्षांच्या इतिहासात कधीही इस्रायलला देश म्हणून मान्यता दिलेली नाही, तसेच पाकिस्तानी पासपोर्टवरही (Pakistani Passport) इस्रायल प्रवासाला बंदी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.