जळगाव,दि.२३: Uddhav Thackeray Sabha: जळगावातील पाचोऱ्यातील सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर व भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार आर.ओ पाटील यांची कन्या ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी या सभेचं आयोजन केलं आहे. या सभेवरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी इशारा दिला होता. आम्ही दगड मारून सभा, आंदोलनं उधळून टाकणारी लोक आहोत, असं पाटलांनी म्हटलं होतं. याचा आता उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला आहे.
काही जणांचा वाटलं तेच म्हणजे शिवसेना आहेत | Uddhav Thackeray Sabha
“काही जणांचा वाटलं तेच म्हणजे शिवसेना आहेत. अरे हट्ट… आम्ही सभेत घुसणार म्हणतात… अशा घुशी खूप पाहिल्यात आम्ही. पण, निवडणुकीत अशा घुशींना त्यांची बिळ खोदून, शेपट्या धरून राजकारणात आपटायची आहेत,” असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे गुलाबराव पाटलांवर केला आहे.
पाकिस्तानला विचारलं शिवसेना कोणाची, ते सुद्धा सांगतील | Uddhav Thackeray
“पाकिस्तानला विचारलं शिवसेना कोणाची, ते सुद्धा सांगतील. पण, आमच्याकडं मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयुक्तांना दिसलं नाही. त्यांचा धृतराष्ट्र झालाय माहिती. मात्र, हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हे त्यांनी ओळखलं नाही,” असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
“निवडणूक आल्यावर तुम्ही प्रचार करता, मरमर राबता आणि हे पिकोजी वरती बसतात. संजय राऊत ‘गुलाबो गँग’ म्हणतात. यांना वाटतं आपण घोड्यावर बसलो. घोड्यावर बसल्यावर लाथा सुद्धा लोकांनी खायच्या आणि तुम्ही आरामत बसायचं, हे आता चालणार नाही. जसं घोड्यावर चढवलं होतं ना, तसं आता पुन्हा खाली खेचण्याची वेळ आहे,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
निवडून दिलेले गद्दार झाले, पण निवडून देणारे…
“निवडून दिलेले गद्दार झाले, पण निवडून देणारे आजही माझ्याबरोबर आहेत. ज्यांनी आपल्या भगव्याला कलंक लावला तो कलंक धुवायचा आहेत. तो कलंक लावणारे हात राजकारणात कायमचे गाढून टाकायचे आहेत,” असं टीकास्र उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर सोडलं आहे.
“वाट बघत होतो, घुसणारे कधी घुसणार आहेत. पण, घुसण्याची हिंमत दाखवली नाही. दाखवू शकत नाही. संजय राऊत बोलले होते, ‘तुम्ही घुसाल तर पर जाऊ शकणार नाही.’ अजूनही आम्ही संयम बाळगतोय, म्हणजे नामर्द नाही,” असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.