मुंबई,दि.23: Sharad Pawar On Prakash Ambedkar: शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांशी काय चर्चा झाली सांगितले आहे. अलीकडेच वंचित बहुनज आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आले होते. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येणार का? या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची दोन दिवसांपूर्वी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली होती. पण, त्यांच्यात काय चर्चा झाली हे कळू शकलेलं नव्हतं.
शरद पवारांनी सांगितले प्रकाश आंबेडकरांशी काय चर्चा झाली | Sharad Pawar On Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकरांच्या भेटीवर आता शरद पवारांनी भाष्य केलं आहे. ते अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तेव्हा प्रकाश आंबेडकरांच्या भेटीमागाचं काय कारण आहे? असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले, “कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा झाली आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं.
“आंबेडकरांशी आमची चर्चा झाली आहे. कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांनीही काही उमेदवार उभे केले आहेत. त्यांनी आणि आम्ही लढणाऱ्या जागा वेगवेगळ्या असतील, तर सहकार्य करता येईल का? याबाबत चर्चा केली आहे. आंबेडकर त्यांच्या उमेदवारांची यादी माझ्याकडं पाठवणार आहे. आमच्या उमेदवारांची यादी त्यांना देण्यात येईल. यानंतर आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
2024 च्या निवडणुक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार का? वंचित आघाडीही बरोबर असेल का? असा प्रश्न शरद पवार विचारला. त्यावर त्यांनी सांगितलं, “वंचित आघाडीबरोबर आमची चर्चा झाली नाही. वंचितशी आमची चर्चा कर्नाटकातील मर्यादित जागेशिवाय दुसरी कोणतीही झाली नाही. सध्यातरी महाविकास असून, एकत्र लढण्याची इच्छा आहे. इच्छा नेहमीच पुरेसी नसते. जागांचं वाटप अजून ठरलंच नाही.”