रत्नागिरी,दि.6: मंत्री उदय सामंत Uday Samant यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांबाबत मोठा दावा केला आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant News) यांनी महाविकास आघाडीमधील आणखी 12 ते 13 आमदार शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात आहे. महाविकास आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे. यापूर्वीच शिवसेना (ठाकरे गट) नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी विद्यमान राज्य सरकार कोसळेल म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले असल्याचा मोठा दावा केला होता.
शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन मध्यावधी निवडणुकीची शक्यता फेटाळून लावली. यावेळी त्यांनी धक्कादायक दावाही केला.
मध्यावधी निवडणूक लागण्याची कोणतीही शक्यता नाही, उलट महाविकास आघाडीमधील आणखी 12 ते 13 लोकं शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात आहे. महाविकास आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहे. 170 हा आकडा भाजप आणि शिंदे यांच्याकडे आहे, असा दावाच सामंत यांनी केला.
महाविकास आघडीत काय आलबेल ते आज पुढे आले आहे. सध्या लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत आलो त्यावेळी खोके घेतले होते का? असा उलट सवालच सामंत यांनी विचारला आहे.