सोलापूर,दि.१४: पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी शत्रूंबरोबरच संकटाशी दोन हात करत अतुलनीय कार्य केले. त्यांची जलनीती, समाजनीती, रणनीती, अर्थनीती, न्यायनीती, धर्मनिती प्रचलित आहे. तीर्थक्षेत्रांच्या जीर्णोद्धारात त्यांचा मोठा वाटा आहे. अशा त्यांच्या कार्याचा वारसा आजच्या राजकारण्यांबरोबरच महिला भगिनींनीही जपण्याचे आवाहन महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांनी केले.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त बिरूलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीने पार्क चौकातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मल्लिकार्जुन चोपडे, यल्लप्पा डबरे, बसवराज करली, शिवानंद मंदकल, अभिषेक बाईकट्टी, लक्ष्मण पुजारी, युवा नेते बिपीन पाटील, यल्लप्पा करली, प्रशांत गाडेकर, यल्लप्पा पुजारी, शिवानंद कंटीकर, लिंगराज टिंगी, नागू कंटीकर, लिंगराज मासरेड्डी, पवन तगारे, सिद्राम गोरकल, व्यंकटेश जाटगल, महेश मलूरे,नवीन गोटीमुकुल, विकास जाटगल, विजय कोळी, महेश बिराजदार, किरण मेटी यांच्यासह भवानी पेठेतील नागरिकांसह समाज बांधव उपस्थित होते.
अभिवादनासाठी जमलेल्या समाज बांधवांनी जय अहिल्या, जय मल्हारच्या दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पुतळा परिसरात पिवळ्या रंगाच्या पताका मोठ्या डौलाने फडकल्या. तरुणाईबरोबरच तरुणींची उपस्थिती लक्षणीय होती. समाजातील सर्व स्तरातील माणसं सकाळपासून अभिवादन करण्यासाठी पार्क चौकात गर्दी केली होती.
समाजात राजकारण नको: सुरेश पाटील
माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांनी समाजात एकजूठ ठेवून, संघटन वाढवून प्रगती साधा, असे सांगत समाजात राजकारण न करण्यात प्रगतीसाठी वज्र मुठ आवळण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.