सोलापूर,दि.१: आयडल्स बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रावजी सखाराम हायस्कूल येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक कुणाल बाबरे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, ज्यानंतर संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या मुख्य सत्रात शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक कुणाल बाबरे, उद्योजक सीए धीरज जवळकर, रोटरी मूकबधिर विद्यालयाचे सचिव सुनील दावडा, रावजी सखाराम हायस्कूलचे प्राचार्य भरत केत, दीपक शिंदे आणि संभाजी जौजंट यांची प्रमुख उपस्थिती होती.
पदाधिकारी व शिक्षक वर्ग उपस्थित
कार्यक्रमाला उत्सव अध्यक्ष श्रीशैल हिरेमठ, राजकुमार बाबरे, शेरा तुळसे, सुमित शिवशरण, आनंद बनसोडे, सुमित बाबरे, कपिल बाबरे, हर्षल बाबरे, सचिन सावंत, गुरुनाथ कोळी, उज्ज्वल बाबरे, अनिल हलकट्टी, रोहन गायकवाड, सचिन पाटील, मोहित राऊत, आकाश भोसले, राहुल गंगीशेट्टी, प्रवीण बंदगी आणि श्रीशैल स्वामी उपस्थित होते.
तसेच रावजी सखाराम हायस्कूलचे शिक्षक व कर्मचारी महावीर आळंदकर, अजहर शेख, गजानन गोरे, रमेश वडावराव, वंदना डांगे यांच्यासह आयडल्स बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








