Home धार्मिक गुरुवारी हरिभाई देवकरण मैदानावर बी. के. शिवानी दीदींचे ‘सरल मन, सरल जीवन’...

गुरुवारी हरिभाई देवकरण मैदानावर बी. के. शिवानी दीदींचे ‘सरल मन, सरल जीवन’ विषयावर प्रवचन

0

सोलापूर,दि.१७ : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, सोलापूर यांच्या वतीने गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी वक्त्या बी. के. शिवानी दीदी यांचे ‘सरल मन, सरल जीवन’ या विषयावर विशेष प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मनाला शांती आणि जीवनाला समृद्ध बनवण्यासाठी अध्यात्माची नितांत गरज निर्माण झाली आहे. मात्र, त्यासाठी योग्य व्यासपीठ आणि मार्गदर्शन मिळत नाही. हीच गरज ओळखून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये संतुलित व आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा, मनःशांती, तणावमुक्त जीवन, सकारात्मक विचार, भावनिक बुद्धिमत्ता, स्व-व्यवस्थापन, नातेसंबंधातील सुसंवाद, कर्मसिद्धांत, आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि आत्मपरिवर्तन अशा विविध विषयांवर बी. के. शिवानी दीदी मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमासाठी http://www.omshanti.in/solapur या संकेतस्थळावर पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र, पूर्वनोंदणी झाली नसली तरीही सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला असून कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू होणार आहे.

अधिक माहितीसाठी ८६६९१६३३७२ किंवा ७७७४९९८८७७ या क्रमांकांवर संपर्क साधावा, तसेच सोलापूरकरांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.