सोलापूर,दि.21: सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने शुक्रवारी (दि.21) 41 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्यांचे आदेश काढले आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांची नेमणूक करण्यात आहे. तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मनिषा आव्हाळे यांना संधी मिळाली आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची नेमणूक आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झाली आहे. झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी यांना अजून पोस्टिंग मिळालेली नाही. पुढील आठवड्यात सोलापूरला मिळालेले दोन्ही अधिकारी नव्या ठिकाणी रूजू होणार आहेत.