मुंबई,दि.१५: Shivani Wadettiwar On Savarkar: माजी मंत्री आमदार आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची कन्या, तसेच प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांनी खळबळजनक दावा केला आहे. शिवानी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं पहायला मिळतंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय (Maharastra Politics) वर्तुळात मोठं वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकर (Savarkar) यांच्याविषयी बोलताना हे वक्तव्य केलंय.
बलात्कार हे राजकीय शस्त्र असून हे शस्त्र… | Shivani Wadettiwar On Savarkar
बलात्कार हे राजकीय शस्त्र असून हे शस्त्र तुम्ही आपल्या राजकीय विरोधात वापरलं पाहिजे, असे सावरकरांचे विचार होते, असा दावा शिवानी वडेट्टीवार यांनी केला आहे. या विचारांशी प्रामाणिक असलेल्या लोकांपासून, माझ्यासारख्या आणि इथं उपस्थित असलेल्या महिलांनी सुरक्षित कसं समजावं? असा सवाल शिवानी वडेट्टीवार यांनी भर कार्यक्रमात उपस्थित केला. त्यावेळी त्यांनी भाजपच्या सावरकर गौरव यात्रेवर देखील खोचक टीका केली.
शिवानी वडेट्टीवार यांनी ट्विट करत… | Shivani Wadettiwar
सावरकरांनी ‘सहा सोनेरी पाने’ या त्यांच्या पुस्तकात बलात्कार हे राजकीय हत्यार आहे, हे विकृत विधान केलेलं आहे. ज्यांना पुरावा पाहिजे त्यांनी ते पुस्तक वाचावे, असं शिवानी वडेट्टीवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
ही लोकं फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारांवर कधीच मोर्चा…
दरम्यान, शिवानी वडेट्टीवार यांनी नाव न घेता शिंदे फडणवीसांवर टीका केली. ही लोकं फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारांवर कधीच मोर्चा काढणार नाहीत. तर कुठला मोर्चा काढतात तर… सावरकर मोर्चा. महिलांना भीती वाटत असेल तर काय उपयोग?, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आणि सरकारवर बोचरी टीका केली.