शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी शिवानंद भरले तर सरचिटणीसपदी राजकुमार वराडे

0

पुणे,दि.20: राज्यातील जिल्हा परिषद सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांची सहविचार सभा पुणे येथील शिक्षक भवनात पार पाडली. या सभेत 8 सेवानिवृत्त शिक्षकाचे राज्य कार्यकारी मंडळ निवडण्यात आले आहे.

अध्यक्ष म्हणून सोलापूरचे शिवानंद भरले तर सरचिटणीस म्हणून हिंगोलीचे राजकुमार वराडे, कार्याध्यक्ष म्हणून पालघरचे गोपाल आघीवाले, कोषाध्यक्ष म्हणून सातारचे तुकाराम कदम, उपाध्यक्ष म्हणून सिंधुदूर्गचे हरिभाऊ निसरड, सल्लागार म्हणून नवीमुबंईचे प्रभाकर डहाके तर महिला प्रतिनिधी म्हणून अहमदनगरचे हसिना मुलाणी, सोलापूरचे प्रिया सहस्त्रबुध्दे, खाजगी शिक्षक प्रतिनीधी म्हणून मल्लीकार्जून पाटील, आदींची एक मतांनी अगामी 5 वर्षासाठी निवडण्यात आली आहे.

राज्य स्तरावरून उर्वरीत जिल्ह्यातील सेवानिवृत्तांना प्रतिनीधी निवडण्याचे अधीकार कार्यकारी मंडळाला देण्यात आले आहेत.

सर्वसाधारण सभा जेष्ठ नेते किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सिध्देश्वर पुस्तके सातारा, विठ्ठल पवार हिंगोली, यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न झाली. सभेला 28 जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here