Rohit Pawar On NCP: “निवडणूक आयोग कोणाच्या बाजुने निर्णय देईल याचा अंदाज सर्वांना आहे” रोहित पवार

0

मुंबई,दि.२८: Rohit Pawar On NCP: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी मोठे विधान केले आहे. अजित पवारांसह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. यानंतर खरी राष्ट्रवादी कोणाची हा मुद्दा उपस्थित झाला आहे. यावरून निवडणूक आयोगाने बुधवारी ( २६ जुलै ) शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला नोटीस बजावली आहे. अजित पवार यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर ही नोटीस बजावण्यात आली आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे.

विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, “गेल्या काही वर्षात निवडणूक आयोग सत्तेतील लोकांची बाजू घेते, असं मत सामान्य लोकांचे झाले आहे. निवडणूक आयोगाने नोटीस बजावली असून ती एक प्रक्रिया आहे. ती पूर्ण करत असताना दोन्ही बाजुचे गट ताकद लावतील आणि युक्तीवादही होईल.”

निवडणूक आयोग कोणाच्या बाजुने निर्णय देईल | Rohit Pawar On NCP

“पण, निवडणूक आयोग कोणाच्या बाजुने निर्णय देईल, याचा अंदाज सर्वांना आहे. आम्ही न्यायालयात जात लढाई लढू. पण, येत्या काळात लढत असताना चिन्ह राहिलं नाही, तरी लोकांनाच विचारावे शरद पवार यांना कोणतं चिन्ह मिळालं पाहिजे. ते चिन्ह मिळाल्यानंतर लोकांना विश्वासात घेऊन येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जावं लागणार, याचा अंदाज आला आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलं.

“त्यामुळे चिन्हापेक्षा विचार महत्वाचे आहेत. शरद पवारांबरोबर राहून लढतोय हे आमच्यासाठी महत्वाचं आहे,” असेही रोहित पवार यांनी सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here