सोलापूर,दि.11: सोलापूर क्रमांक 1 या उपविभागातील पोलीस पाटील (Police Patil) भरतीची आरक्षण सोडत मंगळववार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता बहुउद्देशिय सभागृह, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा पोलीस पाटील भरती समिती अध्यक्ष सदाशिव पडदुणे यांनी दिली.
पोलीस पाटील पदांसाठी मंगळवारी आरक्षण सोडत | Police Patil
सोलापूर क्रमांक 1 या उपविभागात प्रवर्गनिहाय लोकसंख्येच्या अनुषंगाने आरक्षण सोडत प्रक्रीया राबवली जाणार आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे खेड, एकरुख, हगलुर, मोहितेवाडी, नंदूर. तरटगांव व समशापूर या ठिकाणची रिक्त पोलीस पाटील पदे भरती प्रक्रियाव्दारे भरावयाची आहेत.
तसेच बार्शी तालुक्यातील मौजे चिखर्डे, नारीवाडी, जहानपूर, ढेंबरेवाडी, महागांव, कळंबवाडी (आ), भोईजे, गोडसेवाडी, पानगांव, नागोबाचीवाडी, फपाळवाडी, लक्ष्याचीवाडी, सुर्डी, उंडेगांव, गाडेगांव, सौंदरे, अरणगांव, भोयरे, कांदलगांव, शेळगांव (मा.), बळेवाडी, तांबेवाडी, हिंगणी पा., भांडेगांव, मालेगांव, रऊळगांव, हिंगणी (आर), मिर्झनपूर, साकत, पिंपरी (आर), सर्जापूर, इर्लेवाडी, तडवळे या ठिकाणची रिक्त पोलीस पाटील पदे भरती प्रक्रियाव्दारे भरावयाची असुन, संबंधित गावातील इच्छुक उमेदवारांनी सदर आरक्षण सोडतीस उपस्थित राहावे असे आवाहन करीता आवाहन उपविभागीय अधिकारी तथा पोलीस पाटील भरती समिती अध्यक्ष सदाशिव पडदुणे यांनी केले आहे.
मंगळवेढा उपविभागातील पोलीस पाटील आरक्षण सोडत | Police Patil Reservation
मंगळवेढा उपविभागातील पोलीस पाटील भरतीची आरक्षण सोडत मंगळववार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.00 वाजता तहसिल कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा पोलीस पाटील भरती समिती अध्यक्ष बी.आर. माळी यांनी दिली.
मंगळवेढा उपविभागातील मंगळवेढा तालुक्यातील 19 व सांगोला तालुक्यातील 12 अशा एकूण 31 रिक्त असलेली पोलीस पाटील पदे भरती प्रक्रीयेव्दारे भरण्यात येणार असून प्रवर्गनिहाय महिला पोलीस पाटील पदांसाठी आरक्षण सोडत प्रक्रीया राबविली जाणार आहे.
मंगळवेढा तालुक्यात मंगळवेढा, बठाण, रहाटेवाडी, तामदर्डी, गणेशवाडी, मेटकरवाडी, डोणज, कचरेवाडी, जुनोनी, कर्जाळ, अकोले, मुढवी, माळेवाडी, पौट,हुन्नुर, मानेवाडी, जालिहाळ, मुंढेवाडी, पाटखळ तर सांगोला तालुक्यातील शिवणे, वाकी (शिवणे), खिलारवाडी, सरगरवाडी, वझरे, यलमार मंगेवाडी, कारंडेवाडी (महिम), मिसाळवाडी, आगलावेवाडी, भोपसेवाडी, गावडेवाडी, चिणके या ठिकाणची रिक्त पोलीस पाटील पदे भरती प्रक्रियाव्दारे भरावयाची असुन, संबंधित गावातील इच्छुक उमेदवारांनी सदर आरक्षण सोडतीस उपस्थित राहावे असे आवाहन करीता आवाहन उपविभागीय अधिकारी तथा पोलीस पाटील भरती समिती अध्यक्ष बी.आर. माळी यांनी केले आहे.